श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात पहिल्याच दिवशी 129 जणांना कोव्हिडची लस

श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात पहिल्याच दिवशी 129 जणांना कोव्हिडची लस

श्रीरामपूर (प्रतिनिधी) -

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने तिसर्‍या टप्प्यात काल कोव्हिड लस देण्यास प्रारंभ केला आहे. त्यानुसार काल श्रीरामपूर येथील

ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभाग, सरकारी अधिकारी, 45 ते 59 वयोगटातील व्यक्ती तसेच 60 वर्षांवरील वयोवृध्द अशा 129 जणांंना कोव्हिडची लस देण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.

सोमवार दि. 1 मार्च 2021 रोजी सकाळी 10 वा.श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात कोव्हिड लस देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. येथील सर्व्हरला मधूनमधून काही तांत्रिक अडचणी येत होत्या. तरीही येथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी कोव्हिड लस देण्याचे नियोजन केल्याने काल 129 जणांना कोव्हिड लस यशस्वी केली.

आरोग्य विभागातील 72 जण, सरकारी अधिकारी फ्रंट लाईन वर्कर 3, वयोगट 45-59 या वर्गातील 3 व्यक्ती तसेच 60 वर्ष वयोगटातील 50 वयोवृध्द अशा 129 जणांना कोव्हिड लस देण्यात आली. काल मंगळवारी कोविड लस देण्याच्या प्रक्रियेस गॅप देण्यात येऊन आज बुधवारी सकाळी पुन्हा कोव्हिड लस देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी पोर्टलवर लसीकरणासाठी नोंदणी करावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. योगेश बंड यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com