कोपरगाव शहरात आणखी 12 करोना बाधित

बाधितांमध्ये कैद्यांचाही समावेश
कोपरगाव शहरात आणखी 12 करोना बाधित

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी | Kopergaon

कोपरगाव शहरातील काल सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचे स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या पाठवलेल्या 10 अहवालांपैकी 3 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर 7 अहवाल हे निगेटिव्ह आले होते. तर दुपारी 174 कोरोना संशयित व्यक्तीच्या टेस्ट करण्यात आल्या त्यात 12 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर 162 निटेटिव्ह आले आहे. तसेच या बधीतांमधे तुरुंगात असलेल्या 5 आरोपीचा देखील समावेश आहे. असे दुपारी चार वाजेपर्यंत 15 कोरोना अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहे. त्यामध्ये सकाळी सापडलेले लक्ष्मी नगर मधील 35 वर्षीय महिला, राममंदिर रोड येथील 35 वर्षीय महिला,तर तालुक्यातील सुरेगाव येथील 42 वर्षीय महिला अश्या तीन रुग्णांचा यात समावेश आहे तर दुपारी स्वामी समर्थ नगर येथील 30 वर्षीय महिला, इंदिरा नगर येथील 60 वर्षीय पुरुष, कोलपेवडी येथील 58 वर्षीय पुरुष, गांधी नगर मधील 45 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष,गोरोबा मंदिर परिसरातील 45 वर्षीय महिला तर समता नगर मधील 38 वर्षीय पुरुष तसेच तुरुंगात असलेल्या 5 आरोपींचा समावेश असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com