जिल्ह्यातील 111 रुग्ण करोनामुक्त
सार्वमत

जिल्ह्यातील 111 रुग्ण करोनामुक्त

आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

आज सकाळी जिल्ह्यातील 111 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील करोनामुक्त झालेल्या रुग्णाची संख्या एकूण 1136 इतकी झाली आहे.

आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये नगर ग्रामीण १, नगर शहर ३७, नेवासा ५, पारनेर ३, राहाता ४, पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट २, राहुरी ४, संगमनेर ३२, श्रीगोंदा १, अकोले ७, कर्जत येथील ०१ रुग्णाचा समावेश आहे.

Deshdoot
www.deshdoot.com