११ मान्यवरांचा 'साईरत्न पुरस्कार' देऊन सन्मान, पहा कोणाकोणाला मिळाला पुरस्कार

११ मान्यवरांचा 'साईरत्न पुरस्कार' देऊन सन्मान, पहा कोणाकोणाला मिळाला पुरस्कार

शिर्डी | शहर प्रतिनिधी

यंदाच्या १११ व्या ऐतिहासिक श्री साईबाबा रामनवमी उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ११ मान्यवरांना शिर्डी रामनवमी यात्रा कमिटीच्या वतीने साईरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

दरम्यान दि.९ एप्रिल ते १३ एप्रिल यादरम्यान शिर्डी शहरात श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ तसेच शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने १११व्या ऐतिहासिक श्री रामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा रामनवमी उत्सवासाठी १११ वर्ष झाल्याने यंदा ११ मान्यवरांना साईरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली. यासाठी सोशल मीडियावर पुरस्कारासाठी नामनिर्देशन नांवे मागविण्यात आली होती. त्यासाठी स्वतंत्र कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्यानुसार शिर्डी तसेच श्री साईबाबांच्या सेवेत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. अशा अकरा मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

११ मान्यवरांचा 'साईरत्न पुरस्कार' देऊन सन्मान, पहा कोणाकोणाला मिळाला पुरस्कार
७ दिवस, ७ हजार किलो रांगोळी अन् ४० कलाकार; डोळ्याचे पारणे फेडणारी साईबाबांची विश्वविक्रमी रांगोळी पुर्ण, पाहा फोटो

कार्यक्रमाचे प्रास्ताविक यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते यांनी केले. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून. यावेळी साईरत्न पुरस्काराचे पहिले मानकरी मुंबईच्या साईसेवक पालखीचे अध्यक्ष नामदेव मलीक ठरले आहे. सन १९८१ सालापासून आजतागायत मुंबई ते शिर्डी पालखी सोहळा अखंडपणे आजतागायत सुरू आहे. ताराचंद कोते व निलेश कोते यांच्या हस्ते भव्य सन्मानचिन्ह देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शिर्डी गांवातील नगरपंचायतचे कर्मचारी बाळासाहेब सोनवणे यांना दिगंबर कोते व अँड अनिल शेजवळ यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गजराव दळवे यांना मुकुंदराव कोते व सुधाकर शिंदे यांच्या हस्ते दिला. श्री साईबाबांच्या पालखी व रथापूढे झांज वाजवून नृत्य सादर करणाऱ्या सन्मित्र युवक मंडळाला साईरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साईबाबांच्या पालखीत अनेक वर्ष ताशा वाजवून सेवा देणारे १०५ वर्ष वयाचे बालमभाई यांना संदीप पारख व प्रताप जगताप यांच्या हस्ते देण्यात आला. मध्यप्रदेशातील रतलाम येथील साईभक्त अनिलभाई सिसोदिया यांना मा.नगराध्यक्षा योगीताताई शेळके व मा.नगराध्यक्षा जयश्री थोरात यांच्या हस्ते दिला. मुंबई येथील श्री साईलीला पालखीचे अध्यक्ष तथा साईभजन गायक श्रावणबाळ इंगळे यांना मा.नगराध्यक्षा अर्चनाताई कोते व मा.अलकाताई शेजवळ यांच्या हस्ते देण्यात आला. मुंबईचे विलासकाका महाडिक यांना देवरामभाऊ सजन यांच्या हस्ते देण्यात आला.पोलीस अधिक्षक आनंद भोईटे यांना हा पुरस्कार मधुकर कोते व तानाजी गोंदकर यांच्या हस्ते देण्यात आला. श्री साईनाथ रुग्णालयातील देवमाणूस डॉ राम नाईक यांना जगन्नाथ गोंदकर व किशोर बोरावके यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

चित्रपट अभिनेते मनोज कुमार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव कुणाल गोस्वामी यांनी प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते मुकुंदराव कोते यांच्या हस्ते स्विकारला. याप्रसंगी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते,माजी सरपंच मुकुंदराव कोते,कैलासबापू कोते, दिगंबर कोते,अभय शेळके,जगन्नाथ गोंदकर,नितीन कोते, मंगेश त्रिभुवन, दिपक वारुळे, रवींद्र कोते, ताराचंद कोते,अजित पारख, बाबासाहेब कोते,नितीन अशोक कोते, गणेश कोते, विकास गोंदकर, विशाल भडांगे, सुनिल परदेशी,राकेश कोते, तुषार शेळके,राहुल गोंदकर, विरेश चौधरी, यावेळी कमलाकर कोते यांनी मनोजकुमार यांच्याबाबत बोलताना सांगितले की, मनोजकुमार शिर्डीकरांच्या हृदयात आहात. आपण केलेल्या ऋणातून शिर्डीकर कधीच मुक्त होऊ शकत नाही. यावेळी मुकुंदराव कोते व कैलासबापू कोते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन मंगेश त्रिभुवन यांनी केले तर आभार दिपक वारुळे यांनी मानले.

Related Stories

No stories found.