१०६ जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज

१०६ जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज

अहमदनगर l Ahmednagar

गुरुवारी एमआयआरसीमध्ये आयोजित समारंभात १०६ सैनिक प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेत दाखल झाले. त्यांना देशसेवा आणि राष्ट्राशी एकनिष्ठतेची शपथ देण्यात आली.

सुकृप थापा यांनी सर्वोत्तम प्रशिक्षणार्थीचे जनरल सुंदरजी गोल्ड मेडल पटकावले. अखौरा ड्रिल स्क्वेअर येथे पासिंग आऊट परेड समारंभ झाला. मेकॅनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंट सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर रसेल डिसोझा यांनी परेडची सलामी घेतली. यावेळी दिमाखदार संचलन झाले.

परंपरांचे पालन करत देशसेवेत दाखल झालेल्या सैनिकांना धर्मगुरूंकडून कर्तव्यनिष्ठा आणि कर्तव्यनिष्ठेची शपथ देण्यात आली. विशाल खारका यांना जनरल केएल डिसोझा सिल्व्हर मेडल आणि सुभम बंडोपंत पाटील यांना जनरल पंकज जोशी कांस्य पदकाने सन्मानित करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com