100 टक्के वसुली करणार्‍या सेवा संस्थांचा गौरव

जिल्हा बँकेकडून पारनेर सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांचा सन्मान
100 टक्के वसुली करणार्‍या सेवा संस्थांचा गौरव

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर (Parner) तालुक्यातील ज्या सेवा संस्थांनी (service organizations) या आर्थिक वर्षात 100 टक्के वसुली (Recovery) केली आहे. त्या सेवा संस्थांचा जिल्हा बँकेच्यावतीने (District Bank) गौरव करण्यात आला आहे.

पारनेर (Parner) येथील जिल्हा बँकेच्या (District) सभागृहात झालेल्या मासिक बैठकीमध्ये (meeting) सर्व सचिव व सेवा संस्थेच्या चेअरमन यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी हा कार्यक्रम जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे (District Bank) संचालक प्रशांत गायकवाड (Director Prashant Gaikwad) यांच्याहस्ते झाला. यावेळी पारनेर (Parner) येथे नव्याने रुजू झालेले सहाय्यक निबंधक गणेश औटी (Ganesh Auti) यांचाही सत्कार करून स्वागत करण्यात आले.

यावेळी सहकारी अधिकारी राजेंद्र वाघमोडे, बँकेचे तालुका विकास अधिकारी इंद्रभान शेळके, प्रभाकर लाळगे, सचिव संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय पतके, मधुकर शेलार आदी उपस्थित होते. यावेळी संचालक गायकवाड म्हणाले, करोना महामारीच्या काळात जिल्हा बँकेने कर्ज वसुलीची मोहीम हाती घेतली होती. याबाबत बँकेचे अध्यक्ष शेळके व संचालक मंडळाने सर्व शाखाधिकारी यांना मार्गदर्शन केले होते. याबाबत आपणही बैठका घेतल्या होत्या. वसुलीच्या आवाहनाला सेवा संस्थांच्या सचिवांनी व पदाधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पारनेर (Parner) तालुक्याची 94 टक्के वसुली केली.

यात 58 संस्थांची बँक (Bank) पातळीवर 100 टक्के वसुली झाली असून पिंपळगाव तुर्क, वेसदरे व काकणेवाडी या गावांच्या सेवा संस्थांनी मेंबर पातळीवर 100 टक्के वसुली केली आहे. तसेच वसुलीसाठी बँकेच्या (Recovery Bank) वतीने महिन्यातून दोनदा बँकेचे शाखाधिकारी व सचिवांची आढावा बैठक (Review Meeting) घेण्यात येत असून लवकरच बँकेचे अध्यक्ष शेळके व संचालक गायकवाड हे तालुक्यातील बँकेच्या सर्व शाखा व 105 सेवा संस्थेच्या प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

तालुकाच्या ठिकाणी सूचना पेटी

बँकेचे शाखाधिकारी, कर्मचारी व सेवा संस्थेचे सचिव यांना बँकेसंदर्भात येणार्‍या अडचणीसाठी पारनेर तालुक्याच्या मुख्य शाखेत सूचना पेटी बसवण्यात येणार असल्याचे संचालक गायकवाड यांनी यावेळी जाहीर केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com