महाराष्ट्रातील केवळ ९० साखर कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी अदा

महाराष्ट्रातील केवळ ९० साखर कारखान्यांकडून १०० टक्के एफआरपी अदा

नेवासा | सुखदेव फुलारी

महाराष्ट्र राज्यातील गळीत हंगाम घेतलेल्या एकूण २०० साखर कारखान्यांपैकी ९० कारखान्यांनी २०२१-२२ या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाची एफआरपीची १०० टक्के रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा केली आहे.

साखर आयुक्तालयाने केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय, साखर संचालनालयाचे मुख्य संचालक (साखर) यांना पाठविलेल्या अहवालात म्हंटले आहे की, यंदाच्या गळीत हंगामात राज्यातील २०० साखर कारखान्यानी हंगाम घेतला. राज्यातील १३२२.३१ लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप केलेले आहे. त्याची एकूण एफआरपीची रक्कम ४१९६६.१४ कोटी रुपये होते. त्यापैकी दि.१५ जुलै २०२२ अखेर ४०८६९.०६ रुपये एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेली आहे. एफआरपी अदा करण्याचे हे प्रमाण ९७.३९ टक्के आहे. ११० कारखान्यांकडे काही प्रमाणत एफआरपीची रक्कम थकीत आहे. नवीन शासन निर्णयानुसार ज्या गळीत हंगामात ऊस गाळप झाला त्याच हंगामाचा साखर उतरा एफआरपी करिता ग्राह्य धरण्यात येणार आहे.

एफआरपी देणारे अदा करणारे कारखाने व टक्केवारी अशी...

एफरारपी टक्केवारी - कारखाने संख्या

१०० टक्के एफआरपी अदा - ९०

८० ते ९९.९९ टक्के - ९९

६० ते ७९.९९ टक्के - ०९

०० ते ५९.९९ टक्के - ०४

आरआरसी कारवाई - ०५

एफआरपी थकीत कारखाने - ११०

राज्यातील एकूण ११० साखर कारखान्याकडे एफआरपी थकबाकी आहे तर ५ साखर कारखान्यांची एफआरपी अदा करण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे. त्यांच्या विरुद्ध साखर आयुक्तालायने आरआरसीची कारवाई केलेले आहे.

गाळप हंगाम २०२२-२३ करिता जिल्हा निहाय उपलब्ध होणारे ऊस क्षेत्र, ऊसाचे गाळप व साखर उत्पादन अंदाज...

जिल्हा -- २०२२-२३ चे ऊस क्षेत्र हेक्टर -- २०२१-२२ चे ऊस क्षेत्र हेक्टर

सोलापूर -- २३००५० -- २५४१२५

कोल्हापूर - १७५५६० -- १७८०९१

नगर -- १६०००० -- २०७८०५

पुणे -- १५७५७० -- १५५२६५

सांगली -- १३७५८५ -- ९२७१५

सातारा -- ११६६२५--११६६२६

बीड--८४२०८--४९५८१

उस्मानाबाद--७४२७५--९३३९६

लातूर--६३१५८--७१२१८

जालना--४७२२७-- ३४४२४

परभणी--४७०५८--५०८९८

औरंगाबाद--४०००--४००३०

नांदेड--३५९४३--३८०५२

नाशिक--३०९६५-- २०९२३

नंदुरबार-- २४०४२--२३२०१

हिंगोली --१७५२०--२७९६८

जळगांव--१६०००--१२०३५

यवतमाळ--१२०००--१२०११

धुळे-- ४३८१-- ४०००

भंडारा--३९१८--२३३८

नागपूर--३२४२--३५२६

वर्धा--१७८४--५३२

गोंदिया--१७२८-- उपलब्ध नाही

सिंधुदुर्ग--१२३६-- उपलब्ध नाही

बुलढाणा--१०९२--उपलब्ध नाही

अमरावती--३५४-- उपलब्ध नाही

अकोला--१५०--उपलब्ध नाही

वाशिम--११७--उपलब्ध नाही

रत्नागिरी--१८-- उपलब्ध नाही

चंद्रपूर--१८--- उपलब्ध नाही

ठाणे--११--उपलब्ध नाही

एकूण-१४८७८३६--१४८८७७०

प्रति हेक्टर सरासरी ऊस उत्पादकता ९५ टन प्रमाणे अंदाज धरून १४१३ लाख मेट्रिक टन ऊस उल्पब्ध होण्याचा अंदाज असून त्यापैकी १३४३ लाख मेट्रिक टन (९५ टक्के) ऊस गाळपास येईल.सरासरी साखर उतारा ११.२० टक्के प्रमाणे साखर उतारा मिळाल्यास १५० लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे. ईथेनाल निर्मितीकरीता बी-हेव्ही मोलासेसच्या माध्यमातून डायव्हर्जन होणारी साखर १२ लाख टन तर संभाव्य साखर उतारा १०.३० टक्के प्रमाणे ईथेनाल डायव्हर्जन मधील साखर वगळून होणारे साखर उत्पादन १३८ लाख टन अपेक्षित आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com