जिल्हयात आज १०० रुग्णांची करोनावर मात
सार्वमत

जिल्हयात आज १०० रुग्णांची करोनावर मात

आतापर्यंत एकूण १२३३ रुग्णाची करोनावर मात

Nilesh Jadhav

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

जिल्ह्यात आज १०० रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहे. यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १२३३ इतकी झाली आहे.

आज जिल्ह्यात नगर ग्रामीण ०२, नगर शहर १५, नेवासा ०६, पारनेर ०७, राहाता ०१, पाथर्डी १०, कॅन्टोन्मेंट १४, राहुरी ०४, संगमनेर २६, श्रीगोंदा ०२, अकोले ०२, कर्जत ०२ आणि कोपरगाव येथील ०९ रुग्ण बरे झाले, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com