आरडगाव |वार्ताहर| Aradgav

गेल्या दहा महिन्यांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या राहुरी तालुक्यातील मानोरी येथील

अंबिका माध्यमिक विद्यालय शाळेची घंटा पुन्हा वाजल्याने विद्यार्थी व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य शासनाने दि.23 नोव्हेंबर रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राहुरी तालुक्यातील पूर्वभागात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यात संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत शाळा सुरू करण्याबाबत पालकांनी नकारघंटा दर्शविली होती.

अशा परिस्थितीत करोनाची भीती कमी होत चालल्याने शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय पालक व शिक्षकांनी घेतला आहे. पालकांनी विद्यार्थ्यांचे संमतीपत्रक शाळेला लिहून दिल्याने शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका व शिक्षक विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. त्यामुळे आम्हा पालकांच्यावतीने विद्याथ्यार्ंना शाळेत पाठविण्यास आमची कुठलीही हरकत नाही.
- डॉ. राजेंद्र पोटे (पालक) मानोरी,ता. राहुरी

मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेताना रेंज मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण होत होती. मात्र, ती अडचण प्रत्यक्षात दूर होऊन शाळा सुरू झाल्याने शिक्षण घेण्यास आम्हाला खूप आनंद होत आहे. तसेच मनातून करोनाची भितीही कमी झाली आहे.
- कु. प्रतिक्षा खुळे, विद्यार्थिनी

शिक्षक व कर्मचारी यांच्या वैद्यकीय तपासणी (करोना टेस्ट) करून शाळेमध्ये दररोज सॅनिटायझर, मास्क, थर्मामीटर याचा उपयोग करून विद्यार्थ्यांविषयी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
- मुख्याध्यापिका निरा मोरे, अंबिका विद्यालय,मानोरी