Corona
Corona
सार्वमत

नगर - जिल्ह्यात १० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह

२९ जणांचे अहवाल निगेटिव्ह तर ४ रुग्णांनी केली करोनावर मात

Nilesh Jadhav

अहमदनगर ( प्रतिनिधी ) - आज सकाळी जिल्ह्यात १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहर ०७, अकोले तालुका ०२ आणि संगमनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील ९० वर्षांच्या आजीबाईसह ४ रुग्णांनी केली करोनावर मात केली आहे. यात अहमदनगर मनपा क्षेत्रातील ३ आणि श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील करोना बधीतांची संख्या ४७५ झाली आहे. तर करोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३११ असून १५० रुग्ण सध्या उपचार घेत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com