नेवासा तालुक्यात 10 नवीन करोना बाधित
सार्वमत

नेवासा तालुक्यात 10 नवीन करोना बाधित

तालुक्याची एकूण रुग्ण संख्या 119 वर

Nilesh Jadhav

नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa

नेवासा तालुक्यात आज 10 नवीन करोना बाधित आढळून आले आहे. मध्ये कुकाणा येथील 6, नेवासा येथील 3 तर शिरसगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

कुकाणा येथे 25 जुलै रोजी आढलेल्या करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 6 व्यक्ती करोना बाधित आढळून आले. यात 35 वर्षाची एक महिला 36 वर्षाची एक महिला,14 वर्षाची एक मुलगी तर 10 वर्षाचा मुलगा,11 वर्षाचा मुलगा, 12 वर्षाचा मुलगा तर नेवासा शहरांतील एक 35 वर्षीय करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील 15 जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यामध्ये एक 12 वर्षाची मुलगी, एक महिला 38 वर्ष, एक पुरुष 50 वर्ष हे 3 व्यक्ती करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. शिरसगाव येथे एक 72 वर्ष व्यक्ती करोना बाधित आढळला आहे. तालुक्यातील बाधितांची संख्या 119 झाली असल्याची माहिती तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com