मोफत प्रवेशाच्या १ हजार १३९ जागा रिक्त

प्रवेशासाठी पुन्हा १० मे पर्यंत मुदतवाढ
मोफत प्रवेशाच्या १ हजार १३९ जागा रिक्त

अहमदनगर (प्रतिनिधी)

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील मुलांना शाळेत मोफत प्रवेश देण्यातही शिक्षण विभाग पुरता अपयशी ठरला आहे. जिल्ह्यातील ४०० शाळांतील २ हजार ९२४ जागांपैकी दोनदा मुदतवाढ देऊनही भरता आलेल्या नाहीत. जिल्ह्यात आजही १ हजार १३९ जागा रिक्त असून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने या मोफत प्रवेशासाठी पुन्हा १० मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार विनाअनुदानित, कायम त्यांच्या क्षमतेच्या पंचवीस टक्के जागा राखून ठेवल्या आहेत. या जागांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलांना मोफत प्रवेश देणे शाळांना बंधनकारक आहे. या प्रवेशासाठी जिल्ह्यातील ४०० शाळांनी शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर नोंदणी केली होती, नोंदणी केल्यानंतर या शाळांतील रिक्त जागांसाठी अर्ज करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने आवाहन केले.

मोफत प्रवेशाच्या १ हजार १३९ जागा रिक्त
गुलाबाची कळी....! प्राजक्ता माळी गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय झक्कास

परंतु, या आवाहनास फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती. तरीदेखील अर्ज मिळाले नाहीत. २ हजार ९२७ जागांसाठी कसेबसे १ हजार ७७८ अर्ज आले आहेत. अद्याप १ हजार १३९ जागा रिक्त असून यामुळे शुक्रवारी शिक्षण संचालनालयाने या मोफत प्रवेशासाठी पुन्हा १० में पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

तालुकानिहाय रिक्त जागा

अकोले ३१, जामखडे १८, कर्जत २१, कोपरगाव १४०, नगर मनपा १४१, नगर १४२, नेवासा ६२, पारनेर ४१, पाथर्डी १२९, राहुरी १३९, संगमनेर ८०, शेवगाव ५१, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर ६१ यांचा समावेश आहे.

मोफत प्रवेशाच्या १ हजार १३९ जागा रिक्त
'शहनाज गिल'चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

Related Stories

No stories found.