केडगाव-अरणगाव रोडसाठी 1 कोटी

आमदार संग्राम जगताप । टेंडर आणि लगेच कामालाही सुरूवात
केडगाव-अरणगाव रोडसाठी 1 कोटी

अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर शहर विधानसभा मतदारसंघातील केडगाव-अरणगाव रस्त्यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. कामाचे टेंडर निघाल्यानंतर लगेचच प्रत्यक्षात काम सुरू होईल, अशी माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली.

केडगाव-अरणगाव रोड हा नगर शहर विधानसभा मतदारसंघात आहे. दळणवळणाच्या दृष्टीने तो महत्वाचा आहे. या रोडच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी आ. जगताप हे पाललकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करत होते. अखेर राज्य शासनाने या रोडसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ग्रामीण व जिल्हा मार्गासाठी ग्रामविकास विभागाकडून निधी दिला जातो. या धर्तीवर केडगाव-अरणगाव रोडसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

शहर मतदारसंघातील रस्त्यांची कामे करण्याला प्राधान्य दिले आहे. अनेक प्रस्ताव शासनाकडे पाठविले. त्यांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू आहे. हे निधी मंजूर झाल्यानंतर मतदारसंघातील रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत.

- आ. संग्राम जगताप

सर्वाधिक निधी नगरला

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतंर्गत येणार्‍या ग्रामीण व जिल्हा मार्गासाठी जिल्ह्याला 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतील सर्वाधिक रक्कम म्हणजे 1 कोटी शहर मतदारसंघातील अरणगाव-केडगाव रोडला मिळविण्यात आ. संग्राम जगताप यशस्वी झाले. लवकरच अंदाजपत्रक तयार करून टेंडर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती आ. जगताप यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com