राहुरीच्या पूर्वभागात रोहिणीच्या पावसावर पेरण्या सुरू

राहुरीच्या पूर्वभागात रोहिणीच्या पावसावर पेरण्या सुरू

वळण (वार्ताहर) - राहुरी तालुक्याच्या पूर्वभागातील वळण, मानोरी, मांजरी, पाथरे, खुडसरगाव, पिंपरी, कोपरे इत्यादी गावांमध्ये रोहिणी नक्षत्राचा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या भागात शेतकरीराजाने ट्रॅक्टरच्या साह्याने सोयाबीनची पेरणी सुरु केली आहे.

यामध्ये सोयाबीन, मका, कपाशी, या खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली आहे. यापूर्वी शेतकर्‍याकडे बैलजोडी असायची. मात्र यांत्रिकयुगात आधुनिक साधने व सुविधा निघाल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरने पेरणी करू लागला आहे. यापूर्वी शेतकरी राजा सर्जा-राजा, हाऊशा नवश्या असे मोठमोठ्याने ओरडून बैलाच्या पाठीमागे पेरणी करीत असताना जोराने आपापल्या बैलाचे नाव घेऊन मंत्रमुग्ध होते.

मात्र, आता यंत्रयुगात सर्जा-राजाचा विसरच पडला आहे. ्यामुळे प्रत्येक शेतकरी राजा छोटे-मोठे ट्रॅक्टर घेऊन आपली शेती करीत आहे. आता सध्या डिझेलचे भाव वाढल्यामुळे एकरी पेरणीचे भाव बाराशे ते पंधराशे झाल्याने मशागतीचे दरही वाढले आहेत. दरम्यान, पेरण्याच्या वेळेत रोहिणी आणि मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजा खुश आहे. आपापल्या शेतात पेरणी करण्यास सज्ज झाला आहे. सध्या परिसरातील शेतकरी सुदामराव शेळके, प्रकाश खुळे, रोहिदास आढाव, अशोकराव कुलट, बाबासाहेब खुळे, प्रकाश आढाव आदींनी आपल्या शेतात पेरणी करण्यास सुरुवात केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com