ब्राम्हणवाडा-ओतूर जवळील लागाचा घाट ठरू शकतो मृत्यूघंटा

ब्राम्हणवाडा-ओतूर जवळील 
लागाचा घाट ठरू शकतो मृत्यूघंटा

अकोले (प्रतिनिधी) / Akole - अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा जवळील ओतूर कडे जाणार्‍या लागाच्या घाटातील वळणाचा रस्ता व जागीच तीव्र उतार व वळणे असल्याने एसटी बस चालकाची मोठी तारेवरची कसरत होत आहे. मात्र वळणाच्या ठिकाणी रस्त्याचे रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटचे दर्जेदार कठडे टाकण्याची गरज आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे (MP Der. Amol Kolhe) यांनी त्वरीत लक्ष घालावे, अशी मागणी अकोले तालुका ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते तथा खादी ग्रामोद्योग मंडळाचे संचालक भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) यांनी केली आहे

लागाचा घाट हा ओतुर, जुन्नर, पुणे व अकोले, कोतूळ, ब्राह्मणवाडा, नगरच्या जनतेच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण आहे. या घाटात अत्यंत नैसर्गिक दृष्ट्या मनाला भावणारे असे वातावरण आहे. साधारण अर्धा किमी घाट असून ठीकठिकाणी मोठी मोठी वळणे आहेत. ब्राम्हणवाड्याच्या बाजूने उतरताना एक नंबरचे वळण हे अगदी जागीच आहे तर दोन व तीन नंबरच्या वळणावर तीव्र उतार आहे. दोन नंबरच्या वळणावर पावसाने काही जमिनीचा भराव खचून वाहून गेल्याने मोठा खड्डा पडला आहे व तीव्र उतार असल्याने एसटी बस चालकाला स्टेरिंग फिरूनही टर्न लवकर बसत नाही. मागे तीव्र चढ असताना देखील बस मागेपुढे करून एसटी चालकाला टर्न मारावा लागतो चालकाला मागे पुढे घेत असताना ब्रेक न लागल्यास एस टी, वाहतुकीची जड व मोठी साधने 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात याठिकाणी झालेली आहेत शेवटच्या टर्न ला लोखंडी कठडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लावली आहेत मात्र ते फक्त चकाकणारे व दर्जाहीन असल्याचे वाहनांच्या धडकेने ते पूर्णपणे चेपून गेली असल्याचे वास्तव आहे. पुणे जिल्ह्यात धार्मिक व पर्यटनाच्यादृष्टीने मुंबई-नाशिक नगर येथील अनेक पर्यटक भंडारदरा, हरिश्‍चंद्रगड, निळवंडे, कळसुबाई, रंधा फॉल व अमृतेश्‍वर (रतनवाडी) अगस्ती महाराज यांचे दर्शन व जुन्नर तालुक्यातील पर्यटन स्थळे शिवनेरी, ओझर, लेण्याद्री, वडज, निमदरी, नाणेघाट, माळशेज घाट अशा अनेक स्थळांकडे पर्यटकांचा मोठा कल असतो. सर्वांच्यादृष्टीने हा रस्ता महत्त्वाचा व दळणवळणाचा आहे. हा रस्ता ओतूर ते अकोले दुहेरी मार्ग व्हावा व या रस्त्याचे रुंदीकरण त्वरीत करावे, अशी मागणी ग्राहक पंचायतचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे पत्रकाद्वारे केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com