<p><strong>अहमदनगर (प्रतिनिधी) -</strong></p><p> राज्याचे लक्ष लागू असलेल्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणूक निर्णय अधिकारी पदावर जिल्हा उपनिबंधक </p>.<p>दिग्विज आहेर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य सहकार प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी यांनी मंगळवारी काढले आहेत.जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या कार्यक्रम पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आता निवडणूक निर्णय अधिकारी दोन दिवसांत जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम तयार करून तो मान्यतेसाठी सहकार प्राधिकरण आणि विभागीय सहायक निबंधक यांच्याकडे मान्यतेसाठी पाठविणार असून त्यांची मान्यता मिळताच कधीही जिल्हा बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. यामुळे आता ग्रामपंचायत पाठोपाठ सहकारीतील राजकीय ज्वर वाढणार आहे.</p>