कर्जतमध्ये दर शनिवारी जनता कर्फ्यू

इतर दिवशी दुकानांची वेळ सायंकाळी 5 पर्यंतच
कर्जतमध्ये दर शनिवारी जनता कर्फ्यू
संग्रहित

कर्जत (प्रतिनिधी) - करोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनास प्रतिसाद देत कर्जत व्यापारी असोसिएशनने आज बैठक घेऊन शहरातील दुकानांची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच 30 जूनपर्यंत दर शनिवारी जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याने या दिवशी शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना देण्यात आले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जून भोज, उपाध्यक्ष प्रसाद शहा, खजिनदार संजय काकडे, सचिव बिभीषण खोसे, विजय तोरडमल, अभय बोरा, संतोष भंडारी, राजेंद्र बोरा, मिलिंद बागल, अभिषेक बोरा यांच्यासह व्यापारी उपस्थित होते

यावेळी व्यापारी आघाडी उपाध्यक्ष प्रसाद शहा म्हणाले की, करोनाची दुसरी लाट अतिशय भयानक होती. या काळामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी व नागरिक व्यापारी यांनी अतिशय संयम या ठिकाणी दाखवला. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात अगोदर कर्जत तालुक्यामध्ये करोना लाट आटोक्यात आली.

या वेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, नगरपंचायतचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी विविध सूचना केल्या.

गटविकास अधिकारी अमोल जाधव यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मोठ्या गावातील व्यापार्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com