पतसंस्थेत कोट्यावधींचा घोटाळा

पतसंस्थेत कोट्यावधींचा घोटाळा

कळवण । प्रतिनिधी | Kalwan

श्री स्वामी समर्थ नागरी पतसंस्थेमध्ये (Shri Swami Samarth Nagari Patsanstha) कोटयावधी रुपयांचा घोटाळा (scam) झाला असून संस्थेला टाळे लागले आहे. त्यामुळे या संस्थेची आर्थिक गुन्हे शाखाकडून (Economic Crimes Branch) चौकशी (Inquiry) करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.

श्री स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था, मर्यादित कळवण (kalwn) मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार (Corruption) झाला आहे. सर्वसान्य नागरिकांच्या 14 कोटी रुपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. गेली दोन वर्षांपासून संस्था बंद आहे. त्यामुळे ठेवीदारांना ठेवी परत मिळण्यासाठी कळवण शहरापासून पाच किमी अंतरावर असलेल्या सहाय्यक निबंधक कार्यालयात (Office of the Assistant Registrar) हकनाक चकरा मारण्याची वेळ आली आहे.

अधिकार्‍यांकडून वसुली असुसुरु आहे. वसुली झाल्यावर पैसे देऊ अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. या ठेवीदारांमध्ये (Depositors) अनेक आजारांचे रुग्ण आहेत. तर काही ठेवीदारांनी मुलींच्या लग्नसाठी पोटाला चिमटा घेऊन पै पै जमा केली होती. काही ठेवीदारांच्या मुलांचे शिक्षण थांबले आहे. कोरोना (corona) संकटामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे ठेवीदार अडचणीत सापडले आहेत.

असेअसतांना दोन वर्षाचा कालावधी उलटूनही दोषींवर कोणतीच कारवाई शासनाकडून होत नसल्याने ठेवीदार, खातेदार यानी नाराजी व्यक्त केली आहे. या संस्थेची तात्काळ चौकशी करून ठेवीदारांना न्याय द्यावा अशी मागणी ठेवीदार करीत आहे.

दरम्यान, संस्थेच्या ठराविक पदाधिकार्‍यांनी नातेवाईकांच्या नावाने बोगस कर्ज प्रकरणे करून कोटयावधी रॅपये हडप केल्याची चर्चा कळवण तालुक्यात सुरु असून या या कर्ज प्रकरणात कागदपत्रांची अपुरतात असल्याने वसुली करण्यासाठी मोठ्या अडचणी येत असल्याचे समजते. यापूर्वीही कळवण शहरातील दोन ते तीन पतसंस्थांमधील घोटाळा उघडकीस आला आहे.

माझा डांगसौंदाणे येथे हातगाडीवर पाव वडा विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायासातून बचत करून मी एक एक मुदत ठेव पावती या संस्थेत केली होती. कोरोना काळापासून व्यवसायात मंदि आली आहे. उपजीविका भागविणे कठीण अझाले आहे. मला मुलांच्या शिक्षणासाठी व मी स्वतःहृदय विकाराचा रुग्ण असल्याने मला उपचारासाठी पैशांची गरज आहे. अनेक चकरा मारून झाल्या आहेत मात्र एक छदामही मिळत नसल्याने माझेवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शासनाने तात्काळ कारवाई करून ठेव परत देण्यासाठी प्रयत्न करावे.

विरबहादूर कुशवाह, ठेवीदार

या संस्थेच्या 14 कोटी ठेवी आहेत. व कर्ज वसुली पंधरा कोटी रुपये आहेत. थकबाकीदार कर्जदार यांचेकडून वसुलीसाठी कलम 101 नुसार कारवाई सुरु आहे. जे कर्जदार पैसे भरत आहे. त्या रकमेतून जेष्ठ नागरिक, रुग्ण यांना प्राधान्याने थोडी थोडी रक्कम देत आहोत. ठेवीदारांनी संयम ठेवावा. कर्ज वसुली झाल्यानंतर सर्वांच्या ठेवी परत केल्या जातील.

के. डी. गायकवाड, सहाय्यक निबंधक कळवण

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com