जि.प.ची आज ऑनलाईन सभा

जि.प.ची आज ऑनलाईन सभा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या Nashik Zilla Parishad स्थायी समितीची बैठक शुक्रवारी (दि.14) सकाळी 11 वाजता ऑनलाईन Online Meeting पद्धतीने बोलावण्यात आली आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातर्फे देण्यात आली.

जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर करोनाबाधित असल्याने घरूनच ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत. जि. प. स्थायी समितीची सभा सेवकांच्या प्रतिनियुक्तीच्या ठरावाची अंमलबजावणी न झाल्याने सदस्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने 17 डिसेंबरला तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाने प्रतिनियुक्त्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली असली तरी त्या समितीची आतापर्यंत केवळ एकच बैठक झाली आहे.

यामुळे या स्थायी समिती बैठकही त्या प्रश्नावरून सदस्य आक्रमक होण्याची शक्यता ओळखून प्रशासनाने करोनाच्या निमित्ताने सभा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या करोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत सभांबाबत कोणताही उल्लेख नसताना कार्यालयीन बैठकांबाबतचा आदेश विषय समित्यांच्या सभांसाठीच आहे, असा सोयीचा अर्थ घेऊन सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com