जि.प.कर्मचारी पतसंस्था निवडणूक : सहकार पॅनल तर्फे गाठीभेटीना वेग

जि.प.कर्मचारी पतसंस्था निवडणूक : सहकार पॅनल तर्फे गाठीभेटीना वेग

नाशिक । प्रतिनिधी Nashik

 नाशिक जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत सहकार पॅनलने सोशल मीडिया, तसेच वैयक्तिक भेटीगाठीच्या माध्यमातून प्रचारात आघाडी घेतली आहे.

 सहकार पॅनलतर्फे सर्वसाधारण गटात सचिन अत्रे,अमित आडके,रवींद्र थेटे,रंजन थोरमिसे,नितीन पवार,चंद्रशेखर पाटील,सचिन पाटील,तालुका प्रतिनिधी - किशोर अहिरे, गणेश गायकवाड,नंदकिशोर सोनवणे,इतर मागासवर्ग प्रवर्गातून विक्रम पिंगळे,विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून अनिल दराडे,

अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून - मंगेश जगताप,महिला राखीव प्रतिनिधी गटातून अर्चना गांगोडे,सरिता पानसरे खैरे हे १५ उमेदवार निवडणुकीसाठी सहकार पॅनलतर्फे निवडणूक रिंगणात आहेत.

वर्षानुवर्ष बिनविरोध निवडणूकीच्या नावाखाली ठराविक तथाकथित नेते मनमानीपणे सत्ता उपभोगत आहेत. प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी सहकार पॅनलची निर्मिती करण्यात आली आहे.नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी हाच हेतू आहे.असे पॅनल प्रमुख रविंद्र आंधळे व प्रमोद निरगुडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com