जि.प.सेवक करणार घंटानाद आंदोलन

जि.प.सेवक करणार घंटानाद आंदोलन

नाशिक । प्रतिनिधी

जिल्हा परिषद सेवकांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जुलै महिन्यात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ( 4340 ) सर्व संवर्गिय संघटनेतर्फ एक दिवस घंटानाद आंदोलन व 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून संप पुकारण्यात येईल,अशी घोषणा अध्यक्ष बलराज मगर यांनी सर्व उपस्थितांशी चर्चा करुन घोषणा केली.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (4340) सर्व संवर्गिय संघटनेची राज्यस्तरीय ऑनलाईन सभा संघटनेचे अध्यक्ष बलराज मगर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. बाबुराव पुजरवड कार्याध्यक्ष, विवेक लिंगराज यांच्या उपस्थितीत पार पडली. सभेत राज्य भरातून जिल्ह्याच्या पदाधिकार्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपले प्रश्न मांडले.

यामध्ये प्रामुख्याने कर्मचार्‍यांचे वेतन व पेन्शन वेळेवर होणे, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा हप्ता जमा करणे. विनंती बदलीची 3 वर्षाची अट शिथिल करुन ती 1 वर्ष करणे. ग्रेड पे मधे सुधारणा करणे.वर्ग 4 मधून कनिष्ठ सहाय्यक 50: 40:10 नुसार भरणे परीक्षा सुट बाबत पूर्ववत वयोमर्यादा 45 ची ठेवणे.

लेखा कर्मचारी यांचे प्रत्येक पदाला होणारी परीक्षा 10/20/30 या लाभासाठी शिथिल करणे. एमडीएस व लेखा कर्मचारी वर्ग 2 चे पदोन्नती कोट्याचे प्रमाण वाढविणे. सन2005 नंतरचे कर्मचारी यांना पूर्ववत पेन्शन लागू करणे. आगाऊ वेतनवाढ पुन्हा पूर्ववत सुरू करणे आदी मागण्या शासनाने तात्काळ मार्गी लावाव्यात. अन्यथा जुलै 2021 मधे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस घंटानाद आंदोलन. व 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे दिवसापासून संप पुकारण्यात येईल.अशी बलराज मगर यांनी सर्व उपस्थितांशी चर्चा करुन घोषणा केली.

सभेला नाशिक येथून संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार हळदे , पेन्शन संघटनेचे दिलीप वारे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रकाश थेटे, अजय कस्तुरे, प्रशांत कवडे, श्रीरंग दिक्षित, अनिल गिते, संदीप दराडे, शालीग्राम उदावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com