दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

कोविड काळात प्रतिकूल परिस्थितीत शिक्षक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहचून अध्यापनाचे कार्य केले. जिल्हा परिषद शिक्षकांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले.

दिंडोरी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने ज्ञान पुष्प पारितोषिक वितरण व शिक्षक मित्र पाक्षिक अनावरण सोहळ्याप्रसंगी क्षीरसागर बोलत होते. वलखेड येथे ज्ञान पुष्प पारितोषिक वितरण व शिक्षक मित्र पाक्षिक अनावरण सोहळ्याचे शिक्षण विभाग व विविध संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार मीठे होते. व्यासपीठावर पंचायत समिती सभापती कामिनी चारोस्कर, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, सहायक गटविकास अधिकारी शेवाळे, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज ,साहित्यिक संदीप जगताप, शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, शिक्षक समितीचे काळू बोरसे, माजी सभापती वसंत थेटे, विठ्ठल अपसुंदे आदी मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी शिक्षकांसाठी ऑनलाईन 100 गुणांची ज्ञान पुष्प चाचणीचे आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेत प्रत्येक केंद्रातील 3 शिक्षक असे एकूण 57 शिक्षकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम अनिल भरीतकर, व्दितीय क्रमांक संदीप झोटींग, तृतीय क्रमांक प्रमोद देवरे आदीचे जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी अंबादास वाजे, काळू बोरसे यांना शिक्षक रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विजयकुमार मीठे, सभापती कामिनी चारोस्कर, साहित्यिक संदीप जगताप, विठ्ठल अपसुंदे, माजी सभापती वसंत थेटे आदींनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधकारी सुषमा घोलप, सुभाष पगार, खंडू सोनार, सुनीता अहिरे, मंगला कोष्टी, वंदना चव्हाण, केंद्रप्रमुख शरद कोठावदे,राजू गांगुर्डे, नामदेव गायकवाड, शार्दुल, किसन पवार, विषय तज्ञ ज्ञानेश्वर क्षीरसागर, रोहिणी परदेशी, प्रमोद शिरसाठ, दीपक पाटील, समाधान दाते, प्रदीप देवरे, धनजय आहेर, रावसाहेब जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रावण भोये यांनी केले.

प्रास्ताविक सचिन वडजे यांंनी केले. आभार गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिन वडजे, दत्तात्रय चौघुले, नौशाद अब्बास, प्रकाश चव्हाण, प्रवीण वराडे जयदीप गायकवाड, बलराम माचरेकर, सुनील पेलमहाले, राहुल परदेशी, विश्वास पाटोळे, किरण शिंदे आदींनी परिश्रम घेतले.