जि.प. समाजकल्याण विभाग विद्यार्थिनींना देणार सायकल अनुदान

मागासवर्गीय विद्यार्थिनींना योजनेतून पाच हजार रुपयांचे अनुदान
जि. प. नाशिक
जि. प. नाशिक

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषद (zilha parishad) समाज कल्याण विभागांतर्गत (Social Welfare Department) २० टक्के मागासवर्गीयांसाठी (backward classes) राखीव सेस (Reserve Cess) अंतर्गत इयत्ता ८ वी ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या ग्रामीण भागातील (rural area) अनुसूचित जाती- जमाती (Scheduled Castes- Tribes), विमुक्त जाती, भटक्या जमाती (nomadic tribes) व नवबौध्द विद्यार्थिनींना (students) सायकल (bicycle) घेण्यासाठी पाच हजार रुपये अनुदान (subsidy) देण्यात येते.

या योजनेचा जास्तीत लाभ विद्यार्थिनींना (students) व्हावा यासाठी जिल्हा परिषद नाशिकतर्फे (Zilha Parishad Nashik) जिल्हयातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, महाविदयालयाचे प्राचार्य व ८ वी ते १२वी इयत्तेत शिकत असलेल्या ग्रामीण भागातील सर्व मागासवर्गीय विद्यार्थिनींना जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्यावतीने (Social Welfare Departments) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विहीत नमुन्यातील प्रस्ताव त्वरीत संबंधित तालुक्याच्या गट विकास अधिकारी (Group Development Officer), पंचायत समिती (panchayat samiti) कार्यालयास सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सायकल योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती - मागासवर्गीय विदयार्थिनी यांना सायकल पुरविणे करिता अनुदान (subsidy) देणे (डिबीटी) या योजनेचा कालावधी दि. ३१ मार्च २०२३ पर्यंत राहील. लाभार्थ्यास त्या तारखेच्या आत सायकल खरेदी करणे अनिर्वाय राहील. सायकल खरेदी बाबतचे देयक सादर केल्यानंतर त्याला देय असलेले पाच हजार अनुदान त्याच्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्यामध्ये डिबोटीव्दारे हस्तांतरीत करण्यात येईल.

या योजने अंतर्गत केवळ मागासवर्गीय विदयार्थिनींना लाभ देण्यात येईल. अर्जदार विदयार्थिनी ही अनूसुचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती व नवबौध्द या संवर्गातील असावी. (जातीचा दाखला सक्षम प्राधिका-याचा असणे आवश्यक राहील.) लाभार्थ्याच्या निवडीबाबत ग्रामसभा यांचा ठराव जोडणे आवश्यक राहील.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com