जि.प. कर्मचारी पतसंस्था चेअरमन पदाची 'या' दिवशी होणार निवड

जि.प. कर्मचारी पतसंस्था चेअरमन पदाची 'या' दिवशी होणार निवड

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषद (zilha parishad) कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या (Employees' Co-operative Credit Institution) अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड (Election of President, Vice President) गुरुवारी (दि.२४) होणार आहे. चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

निवडून आलेल्या संचालकांपैकी ग्रामपंचायत (gram panchayat) विभागाचे कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी नितीन पवार (Junior Administrative Officer Nitin Pawar), माध्यमिक शिक्षण विभागाचे कनिष्ठ सहाय्यक अधिकारी विक्रम पिंगळे (Junior Assistant Officer of Secondary Education Department Vikram Pingle),

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ सहाय्यक अधिकारी अमित आडके, पंचायत समितीचे कनिष्ठ सहाय्यक नंदकिशोर सोनवणे, प्राथमिक शिक्षण विभागाचे (Department of Primary Education) कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी अनिल एकनाथ दराडे यांच्या नावाची चेअरमनपदासाठी चर्चाच आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या पतसंस्थेच्या निवडणुकीत (election) नवनिर्मित सहकार पॅनलने आपला पॅनलचा १५-० ने पराभव केला. यानंतर सहकार पॅनलचे युग सुरू झाले. निवडणुकीत सहकार पॅनलने सभासदांना आकर्षित करण्यासाठी अनेक नवीन योजना, तसेच सभासदांच्या हितासाठी घेण्यात येणाऱ्या निर्णयांचा जाहीरनाम्यात समावेश केला होता.

मागील दोन बिनविरोध निवडणुकांमुळे (Uncontested choice) पतसंस्थेची सत्ता पॅनलचे नेते विजयकुमार हळदे यांच्या अधिपत्याखाली होती. दोन वर्षे करोनामुळे (corona) निवडणूक (election) लांबणीवर पडली होती. आता प्रवीण निरगुडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनल सत्तारूढ होणार असल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com