सेवानिवृत्त सेवकांना पाच तारखेपर्यंत वेतन मिळावे

नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनची मागणी
सेवानिवृत्त सेवकांना पाच तारखेपर्यंत वेतन मिळावे
जिल्हा परिषद

नाशिक | Nashik

जिल्हा परिषद (ZP Retired Employee) सेवानिवृत्त सेवकांना दरमहा 1 ते 5 तारखेला सेवानिवृत्ती वेतन (Retirement Pension) मिळावे, याबाबत शासन स्तरावरून वेळेवर अनुदान प्राप्त करून द्यावे, अशी मागणी नाशिक जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनने (Nashik District Retired Employee Union) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात (Statement) म्हटले आहे की, शासन परिपत्रकान्वये राज्यातील सर्व जिल्हा परिषद सेवानिवृत्त सेवकांना प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत त्यांचे निवृत्ती वेतन न चुकता प्रदान करावे, असे शासनाचे निर्देश (Government directives) आहेत.

मात्र, परिपत्रकाची अंमलबजावणी न होता सेवा निवृत्तीवेतनासाठी शासन स्तरावरूनच उशिरा अनुदान प्राप्त होत असल्यामुळे निवृत्ती वेतनधारकांना प्रत्येक महिन्याच्या पंधरा ते वीस तारखेच्या नंतरच निवृत्ती वेतन मिळत आहे. सेवानिवृत्त सेवक यांना त्यांच्या कौटुंबिक उदरनिर्वाह (Family subsistence) , वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्ती वेतन दरमहा एक तारखेस मिळणे नितांत गरजेचे आहे.

राज्य शासकीय सेवा निवृत्ती सेवक यांचे निवृत्तीवेतन नियमीत दरमहा एक तारखेला होते. यामुळे जिल्हा परिषद सेवानिवृत्त सेवक यांची आर्थिक दृष्ट्या अडचण होत आहे.

याची आपल्याकडून सहानुभूती पूर्वक दखल घेऊन जिल्हा परिषद सेवानिवृत्त सेवकांची निवृत्ती वेतन दर महिन्याच्या एक ते पाच तारखेस व्हावे, याबाबत शासनाकडून वेळेवर अनुदान प्राप्त करण्याची व्यवस्था करावी,अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष उत्तमराव गांगुर्डे, असोसिएशनचे अध्यक्ष उत्तमराव गांगुर्डे, उपाध्यक्ष रवींद्र थेटे, सरचिटणीस मधुकर कांगणे, कोषाध्यक्ष अशोक मानकर, कार्याध्यक्ष दिलीप पाटील, सहकोषाध्यक्ष विजय वानखेडे, सहसचिव दिनकर ठाकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .

जि प अध्यक्ष आमचे ग्राम विकास मंत्र्यांना पत्र

जिल्हा परिषद सेवानिवृत्त सेवकांना दरमहा एक ते पाच तारखेपर्यंत सेवानिवृत्ती वेतन मिळावे, अशी मागणी करणारे पत्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पाठविले आहे.

जिल्हा परिषद अधिनस्थ सेवानिवृत्त सेवकांना दरमहा एक ते पाच तारखेच्या दरम्यान सेवानिवृत्ती वेतन आदा होण्याबाबत शासन स्तरावरून वरून विहित वेळेत सेवानिवृत्त वेतनासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागास निर्देश द्यावेत, अशी विनंती ही या पत्रात अध्यक्ष क्षीरसागर यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com