इच्छुकांसह विद्यमान सदस्यांच्या उरात धडकी

ओबीसी आरक्षणाशिवाय जि.प.,पं. स.निवडणुकींचे संकेत
इच्छुकांसह विद्यमान सदस्यांच्या उरात धडकी

नाशिक । विजय गिते Nashik

धुळे, नंदुरबारसह राज्यातील अन्य पाच जिल्हा परिषदेच्या निवडणुका Election Of Zilla Parishads अखेर ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) आरक्षणाशिवाय होणार हे आता निश्चित झाले आहे.त्याची तयारीही राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे.नाशिक जिल्हा परिषद Nashik ZP व पंधरा पंचायत समित्यांच्या Panchayat Samiti निवडणुकाही पाच - सहा महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत.या निवडणुकाही ओबीसी आरक्षणाशिवाय OBC Reservation झाल्या तर निवडणुकीच्या मैदानातून आपल्याला बाहेर पडावे लागेल.अशा विवंचनेत ओबीसी गटातून निवडून आलेले विद्यमान सदस्य व इच्छुक उमेदवार आहेत.

दरम्यानच्या काळात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक न घेण्याच्या सर्वपक्षीय निर्णयाने काहीसे सुखावलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या ओबीसी गट व गणातील विद्यमान सदस्यांना मात्र,नवीन निर्णयामुळे पुन्हा धडकी भरली आहे. कारण हाच निर्णय पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी कायम राहिल्यास निवडणुकीत आपले काय? याची भीती त्यांना आता भेडसावू लागली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये अस्वस्थता व्यक्त केली जात आहे.राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जातील.असे सर्वच विद्यमान सदस्यांना वाटत होते. त्यामुळे मोठा दिलासाही त्यांना मिळाला होता.

मात्र, हा दिलासा औटघटकेचा ठरला आहे. राज्यात ओबीसींची संख्या निश्चित होऊन ओबीसींचे आरक्षण निश्चित झाल्यानंतरच निवडणुका होतील आणि तोपर्यंत शासनाकडूनही मुदतवाढ मिळेल,अशा खुशीत विद्यमान पदाधिकारी आणि सदस्य होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबारसह राज्यातील पाच जिल्ह्यांच्या निवडणूक कार्यक्रम ओबीसी आरक्षणाशिवाय घोषित केला आहे.

हाच निर्णय पुढच्या वर्षी फेब्रुवारी, मार्च महिन्यात होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीलाही लागू होणार याची दहशत विद्यमान सदस्यांना आहे. असे झाले, तर जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या व पुन्हा याच प्रवर्गातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत असणार्‍या इच्छुकांना या निवडणुकीतून हद्दपार व्हावे लागणार आहे. नाही तर सर्वसाधारण जागेवरून लढण्याची तयारी करण्यासाठी आतापासूनच राजकीय जोर-बैठकांची सुरुवात करावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com