सदस्य - कार्यकारी अभियंता यांच्यात 'तू तू मै मै'

कामांच्या शिफारशी अडवत आर्थिक मागणीचा आरोप
सदस्य - कार्यकारी अभियंता यांच्यात 'तू तू मै मै'
जि. प. नाशिक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या (Zilla parishad construction dept) शिफारशी अडवत होत असलेल्या आर्थिक मागणीच्या तक्रारींचे बांधकाम समितीच्या बैठकीत पडसाद उमटले. सदस्य सिद्धार्थ वनारसे (Sidharth Vanarase) आणि बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज (Executive surendra kankrej) यांच्यात तू तू मै मै झाली. यावरून कंकरेज यांनी जबाबदारी झटकू नये, अशी मागणी वनारसे यांनी केली....

मागील आठवड्यात आर्थिक मागणीच्या मुद्यावरून तहकूब झालेली बांधकाम समितीची मासिक बैठक (Monthly Meeting) उपाध्यक्ष तथा बांधकाम समिती सभापती डॉ. सयाजी गायकवाड (Dr Sayaji Gaikwad) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सदस्य सिद्धार्थ वनारसे यांनी मंजूर झालेल्या कामांच्या शिफारशी ठेकेदारांना वेळेत मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित करत यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करत तिन्ही विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

बांधकाम विभागात ठेकेदारांना काम वाटप बैठकीत कामे मंजूर झाल्यानंतर शिफारशी देण्यासाठी निविदा कारकून पैसे मागत असल्याच्या तक्रारी होत असल्याचे वनारसे यांनी सांगितले.

यावर समिती सचिव कार्यकारी अभियंता कंकरेंज यांनी मोघम आरोप करू नये अशी भूमिका मांडत पुराव्या अभावी बोलू नये, असे सांगण्याचा प्रयत्न केला. यामुळे वनारसे व कंकरेज यांच्यात तू तू मै मै झाल्याचे समजते.यावर कंकरेज यांनी जबाबदारी झटकू नये, अशी मागणी वनारसे यांनी केली.

कार्यकारी अभियंत्यांची तंबी

बैठकीनंतर कार्यकारी अभियंता कंकरेज यांनी बांधकाम विभाग क्रमांक तीनच्या निविदा कारकूनांना बोलावून १४ डिसेंबरच्या काम वाटप समितीच्या शिफारशी देण्यासाठी संबंधित विभागाचे पत्र व सोबत मंजूर कामांची यादी तातडीने पाठवण्याचे आदेश दिले.तसेच ही यादी वेळेत न आल्यास कारवाई करण्याची तंबी दिली.

माळेकर यांचा बहिष्कार कायम

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर ते बोरपाडा रस्त्याच्या कामातील अनियमितताप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नाही. तीन वर्षे उलटूनही या प्रकरणी गुन्हा दाखल होत नसल्याने बांधकाम बैठकीवर बहिष्कार असल्याचे समिती सदस्या रूपांजली माळेकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com