जि.प.ला मिळाला पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी

जि.प.ला मिळाला पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी
जि. प. नाशिक

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) समाजकल्याण अधिकारी (Social Welfare Officer) म्हणून जळगाव येथील समाजकल्याण आयुक्त कार्यालयातील समाजकल्याण अधिकारी (गट ‘ब’ संवर्गातील अधिकारी) योगेश पाटील (yogesh patil) यांची पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे...

पाटील यांनी प्रभारी समाजकल्याण अधिकारी तथा ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्याकडून पदभार घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला सहा वर्षांनंतर पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी मिळाला आहे.

सन 2019 मध्ये डॉ. मंगेश वानखेडे यांनी चार महिने पूर्णवेळ समाजकल्याण अधिकारी म्हणून कार्यभार बघितला होता. हा अपवाद वगळता सहा वर्षांत सर्वच अधिकारी हे प्रभारी होते.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन समाजकल्याण अधिकारी सतीश वळवी (Satish Valvi) यांनी 27 सप्टेंबर 2015 मध्ये पदभार सोडल्यानंतर, आतापर्यंत जिल्हा परिषदेत पूर्णवेळ अधिकार्‍याची प्रतीक्षा होती.

सहा वर्षांच्या काळात अकरा अधिकार्‍यांकडे वेळोवेळी हा प्रभारी पदभार देण्यात आला. मागील 22 महिन्यांपासून ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी (Ravindra Pardeshi) यांच्याकडे अतिरिक्त भार होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com