जि.प. कर्मचाऱ्यांची 'या' मागणीसाठी बाईक रॅली

जि.प. कर्मचाऱ्यांची 'या' मागणीसाठी बाईक रॅली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महाराष्ट्र राज्य जिल्हा परीषद कर्मचारी युनियन संघाच्या (Zilla Parishad Employees Union Sangh) वतीने आज (दि.२१) रोजी नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्वाना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी शहरात बाईक रॅली (Bike rally) काढण्यात आली...

मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफाडे (Bhagwat Doifade) यांच्यामार्फत देण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, सरचिटणीस महेंद्र पवार, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, विक्रम पिंगळे यांनी दिली.

या निवेदनात राज्य शासनाने २००५ पासून सेवेत नियुक्त झालेले कर्मचारी, शिक्षक यांना नवीन पेन्शन योजना लागू करावी. तसेच दर महिन्याला वेतन व निवृत्ती वेतन (Pension) राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे जिल्हा परिषद कर्मचा-यांना देखील १ तारखेला देण्यात यावे व त्यासाठी बीडीएसद्वारे निधी उपलब्ध होण्यासाठी

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकार देण्यात यावे असे म्हटले आहे. त्यासोबतच अनुकंपा भरती (Compassion Recruitment) प्रक्रियेतील टक्केवारी रदद करुन ती पुर्ववत १०० टक्के करावी. लिपिक, लेखा, आरोग्य, वाहनचालक व परिचर यांच्या वेतनत्रुटी दुर कराव्यात. वर्ग ४ च्या कर्मचा-यांना शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदोन्नती देऊन त्याचप्रमाणे ५०-५० टक्के करावे. याशिवाय शासनाकडे प्रलंबित मागण्यांचे निराकरण करण्यासाठी बैठक आयोजित करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, यावेळी महासंघाचे कोषाध्यक्ष जे. डी. सोनवणे, सह कोषाध्यक्ष श्रीरंग दिक्षित, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार हळदे, कार्याध्यक्ष, अजित आव्हाड, रवींद्र आंधळे, प्रशांत कवडे, दिलीप टोपे, योगेश बोराडे, श्रीधर सानप, सुनिल निकम, किरण निकम, प्रमोद निरगुडे, किशोर वारे, विलास शिंदे, राकेश जगताप, कानिफ फडोळ, ज्ञानेश्वर गायकवाड, दिपक भदाणे, सुरेश भोये, कविता पवार, रचना जाधव, मनिषा जगताप, स्वाती बेंडकोळी, संगीता ढिकले, अर्चना दप्तरे, भास्कर कुवर, किशोर वाघ, यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com