जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू

जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीस आपला पॅनल ( Aapla Panel ) व सहकार पॅनलच्या ( Sahkar Panel )उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली आहे. जिल्ह्याच्या विविध भागात जात दोन्ही पॅनलकडून सभासद मतदारांच्या भेटीगाठींना वेग आला आहे.

आपला पॅनलचे नेते विजयकुमार हळदे, पंडितराव कट्यारे यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार यांनी दिंडोरी, कळवण व सुरगाणा या पंचायत समितीस व या तालुक्याअंतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये प्रचार दौऱ्यास सुरुवात केली.

प्रचार दौऱ्या दरम्यान सर्व पंचायत समिती व तालुकाअंतर्गत असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र यांना दिलेल्या भेटीदरम्यान सभासदांनी पाठिंबा दर्शविला. तळेगाव, नांदुरी, बुबळी, पांडाने कनाशी, दळवट प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वैद्यकीय अधिकारी व आरोग्य केंद्राचे सर्व कर्मचारी यांच्या भेटी घेतल्या.

यावेळी जिल्हा स्तरावरून सर्वश्री शेखर फसाळे , प्रशांत कवडे, राजेश आहेर, अजित आव्हाड, योगेश त्रंबके उपस्थित होते

यावेळी उमेदवारांमध्ये भाऊसाहेब गांगुर्डे ज्ञानेश्वर गायकवाड रोहिदास जाधव कानिफ फडोळ योगेश बोराडे दिनकर सांगळे प्रकाश थेटे संदीप दराडे प्रदीप अहिरे संगीता ठिकले सुमनताई पाटील बापूसाहेब अहिरे प्रवीण कांबळे विनोद जाधव दिनेश टोपले हे उमेदवार उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com