जि.प. शिक्षण विभागाची 'सेल्फी विथ 'टॉयलेट' स्पर्धा रद्द

जि.प. शिक्षण विभागाची 'सेल्फी विथ 'टॉयलेट' स्पर्धा रद्द

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जागतिक शौचालय दिनाच्या (World Toilet Day) पार्श्वभूमीवर आयोजित 'सेल्फी विथ 'टॉयलेट' (Selfie with Toilet) या ऑनलाइन स्पर्धेस शिक्षक (teachers), सामाजिक संस्था, शिक्षण अभ्यासक (Education Practitioner) आणि शाळा (school) प्रशासनांकडून कडाडून विरोध झाल्यामुळे ही स्पर्धा अखेर रद्द करण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर (zilha parishad) आली आहे.

शिक्षण विभागाने (Department of Education) पथनाट्य, चित्रकला, 'सेल्फी विथ 'टॉयलेट' या स्पर्धांचे आयोजन केले होते. यासंदर्भातील परिपत्रकही शाळांना पाठविण्यात आले होते. यातील 'सेल्फी विथ टॉयलेट' या स्पर्धेकरिता शिक्षक (teachers), शालेय प्रशासन (School administration), सामाजिक संस्था व शिक्षण विषयातील अभ्यासकांनी विरोध केला होता. या स्पर्धा पार पडल्यानंतर पारितोषिक वितरणही करण्यात येणार होते.

स्पर्धा रद्दची ही आहेत कारणे

शाळांमध्ये एकूण विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या अत्यल्प आहे. या शौचालयांच्या स्वच्छता व डागडुजीसाठी पुरेशा निधीची तरतूद नाही. शौचालयांची नियमित स्वच्छता नाही. स्वच्छतागृहे जुनी असून, अनेक ठिकाणी दुरुस्तीची गरज आणि भिंतींची जीर्ण अवस्था, ही वस्तुस्थिती यात डोकावली जाऊ नये यामुळे हा विरोध अनेक शाळांचे प्रशासन, शिक्षक व इतर घटकांकडून केला गेला यामुळे शिक्षण विभागाला 'सेल्फी विथ 'टॉयलेट' स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com