...अन् त्यांनी कथन केला 'आदर्श' प्रवास

...अन् त्यांनी कथन केला 'आदर्श' प्रवास

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) रावसाहेब थोरात सभागृहात २०२१-२२ वर्षाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी संवाद साधला. यावेळी शिक्षकांनी स्वतः केलेल्या उपक्रमांबद्दल माहिती देत शालेय जीवनातील अनुभवांचे कथन केले...

जिल्ह्यातील एक मुख्याध्यापक, नऊ शिक्षक आणि पाच शिक्षिका अशा १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले. या शिक्षकांशी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सोमवारी शिक्षक दिनी संवाद साधत त्यांनी केलेल्या उपक्रमांची माहिती घेतली.

यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाना पुस्तक भेट देत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले. गेल्यावर्षी कोविड काळात अध्यापन करताना शिक्षकांना (Teachers) मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला.

या अडचणींवर मात करत शिक्षकानी अध्ययनाचे काम सुरु ठेवले. यामध्ये काही शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा (Technology) वापर करून विद्यार्थ्यांना शिकवले तर दुर्गम आदिवासी भागात (Tribal Area) ज्या ठिकाणी अध्यापनाला तंत्रज्ञानाची जोड देता येत नाही. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अध्यापनाचे काम केले, या अनुभवातून जिल्हा परिषद स्तरावर कुठले अभिनव उपक्रम राबवता येतील याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी घेतली.

ज्या शिक्षकांचे साहित्य हे पुस्तक स्वरूपात प्रकाशित झाले आहे अशा शिक्षकांची पुस्तके जिल्हा परिषदेतील कार्यक्रमात भेट म्हणून द्यावी असे सांगितले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, प्रभारी शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. यावेळी आदर्श शिक्षिका नलिनी आहिरे यांनी बोलक्या बाहुल्यांच्या प्रात्यक्षिकातून आभार मानले.

'हे' आहेत आदर्श शिक्षक

दिनेश रघुनाथ सोनवणे, हेमंत शांताराम बधान, वृषाली भिला देसले, जयदीप नामदेव गायकवाड, जयवंत हरिश्चंद्र पवार, माधुरी केवलराम पाटील, सुनील त्रिंबक पवार, नलिनी बन्सीलाल आहिरे, चेतन दत्तात्रय अहिरराव, राजेंद्र नारायण पाटील, देवदत्त हरी चौधरी, ज्योती रामनाथ कदम, मोतीराम भगवान भोये, अनिल रमेश महाजन, उज्वला अरुण सोनवणे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com