आयमाच्या पुढाकाराने झूम बैठक संपन्न

आयमाच्या पुढाकाराने झूम बैठक संपन्न

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उद्योजकांच्या (entrepreneurs) विविध प्रश्नांसाठी आयमाच्या( AIMA) पुढाकाराने विविध शासकीय विभागप्रमुखांच्या उपस्थितीत ‘ झूम’ बैठक आयोजित करून उद्योजकांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला.

प्रत्यक्षात गेल्या दोन ते अडीच वर्षांत उद्योजकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा उद्योग मित्रची बैठकच झाली नाही. कोविडचा काळ लोटल्यानंतरही त्याबाबत विचार झालेला नसल्याने उद्योजक संतप्त झाले होते. तेवढ्याच कालावधीत निमा या उद्योजकांच्या संस्थेवर प्रशासक बसलेले असल्याने त्या ठिकाणचे कामकाजही अस्थिर झालेले आहे.

या पार्श्वभूमीवर आयमाच्या पुढाकाराने जिल्हाभरातील उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ‘ झूम’ बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. या मालिकेत सिन्नर व गोंदे येथे वेगवेगळ्या दोन बैठका घेण्यात आल्या. मालिकेतील तिसरी बैठक काल निमा हाऊस सभागृहात झाली.

यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जयंत बोरसे, प्रादेशिक कार्यालयाचे क्षेत्रीय व्यवस्थापक लोंढे, सातपूर पोलीस ठाण्याचे व.पो.नि. महेंद्र चव्हाण, मनपाच्या सातपूर विभागीय अधिकारी जयश्री बैरागी, कामगार विमा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजश्री पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सोमशंकर महाजन, ईएसआयसीचे राजन सिंग, वीज वितरणचे जोगळेकर, बोडके तसेच आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, राजेंद्र अहिर सरचिटणीस ललित बूब हे व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी उद्योजकांनी मागील अडीच वर्षांत साचलेले प्रश्न उपस्थित केले. यावर अधिकार्‍यांनी त्यातील अडचणी सांगून ते प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीला महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, आयमाचे माजी अध्यक्ष रमेश पवार, जे.आर. वाघ, नॅशनल आईस्क्रीम असो.चे राष्ट्रीय सरचिटणीस आशिष नहार, निमाचे माजी उपाध्यक्ष संजय सोनवणे, राधाकृष्ण नाईकवाडे, जयप्रकाश जोशी, मंगेश काठे आदींसह उद्योजक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

कोविडनंतर जिल्हा उद्योग विभागाने सातत्याने मागणी करूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ‘झूम’ बैठकीचा मुहूर्त लागत नसल्याने उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच मागील अडीच वर्षांनंतर बंद असलेल्या निमाच्या सभागृहात बैठक होत असल्याबद्दलदेखील उद्योजकांनी समाधान व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com