सिन्नर
सिन्नर
नाशिक

सिन्नर : नागपंचमीच्या दिवशी जेसीबीसोबत काय केल बघाच...

हे आहे कारण

Gokul Pawar

Gokul Pawar

पंचाळे ।

नागपंचमीच्या दिवशी झोका खेळणे ही प्राचीन परंपरा आहे मुलांचा हट्ट पुरवण्यासाठीअनेक नागरिक आपल्या कुटुंबातील छोट्या-मोठ्या सदस्यांना झोका खेळता यावा म्हणून झाडाला दोराचा झोका बांधतात.

परंतु या हायटेक व गतिमान युगामध्ये झाडांची संख्या कमी झाल्याने झाल्याने झोका बांधण्यासाठी झाडेच शिल्लक नसल्याने झोका कुठे बांधायचा हा मोठा प्रश्न तयार झाला आहे. परंतु यावर उजनी येथील एका शेतकऱ्याने शक्कल लढवली .उजनी येथील उद्योजक मुकुंद सापनर यांनी त्यांच्याकडे असलेल्या जेसीबी मशीनला झोका बांधला व त्या झोक्यावर कुटुंबातील सर्व सदस्यांनी झोका खेळून झोका खेळण्याची हाऊस पूर्ण केली.याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

अनेकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. झाडे कमी झाल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे आपणास नागरिकांना निदर्शनास आणून देण्यासाठी व जनतेने मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करावी, या उद्देशाने आपण जेसीबीला झोका बांधल्याचे व खेळण्याचे फोटो मोबाईलवर टाकले. या फोटोतुन बोध घेऊन जनता मोठ्या प्रमाणात झाडांची लागवड करील असे वाटतेय.

Deshdoot
www.deshdoot.com