नाशिक जिल्हा परिषदेत काळ्या फिती लावून निदर्शने

नाशिक जिल्हा परिषदेत काळ्या फिती लावून निदर्शने

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषद सेवकांच्या (Zilla Parishad Employees) विविध मागण्यांकरिता जिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे (Zilla Parishad Employees Federation) काळ्या फिती लावून निदर्शने (Agitation) करण्यात आली...

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे (Dattaprasad Nade) आणि जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे (Ravindra Shinde) , उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे (Anand Pingale) यांच्यामार्फत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर, कार्याध्यक्ष डॉ.भगवान पाटील, सरचिटणीस महेंद्र पवार, प्रमोद निरगुडे, सचिन विंचुरकर यांनी निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक-शिक्षकेत्तर, चतुर्थ श्रेणी सेवक आणि कंत्राटी व अंशकालिन सेवकांच्या मागण्यांबाबत गेल्या दोन वर्षांपासून वारंवार निवेदने, निदर्शने, आंदोलने करण्यात आले. तरीही केंद्र व राज्य शासनाने दखल न घेतल्याने सेवकांच्या मनात तीव्र आक्रोश आहे.

करोना (Corona) महामारीच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण कार्यात जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील सेवकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून फ्रन्ट लाईन वर्कर म्हणून काम केले. सामाजिक बांधिलकीने कर्तव्य बजावतांना सेवकांचे मोठया प्रमाणावर बळी गेले आहेत.

अशा परिस्थितीत केंद्र शासनाने (Central government) आरोग्य विभाग (Health Department) मजबूत करण्याऐवजी करोना महामारीचा आधार घेऊन खासगी कंपनीला खासगीकरणाचे कंत्राट दिले आहे. सरकारी विभागात सुमारे ४० टक्के पदे रिक्त असताना ती न भरता कामाचा अतिरिक्त तान सद्यस्थीतीतील सेवकांवर शासन लादत आहे.

देशात पेट्रोल, डिझेल, गॅसच्या किमती भडकल्याने महागाईने सामान्य जनतेसह राज्य सरकारी कर्मचारी त्रस्त आहे. शिवाय केंद्र शासनाकडून जीएसटी संकलनातून राज्याला देय असलेला सुमारे ४० हजार कोटींचा वाटा मिळालेला नाही.

या अनुषंगाने अखिल भारतीय राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समितीच्या निर्देशानुसार जिल्हा परीषद कर्मचारी महासंघ यांचे नेतृत्वाखाली सर्व संवर्ग जिल्हा परीषद सेवक, सर्व कंत्राटी व मानधनावरील सेवक संघटनांचे एकजुटीने जिल्हा परीषद मुख्यालय, सर्व पंचायत समित्यासह क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी शासकीय कामाच्या वेळी काळया फिती लावल्या. दुपारच्या भोजन सुटीत निदर्शने करून शासनाचे लध वेधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी बापू चौरे, जी. बी. खैरनार, निवृत्ती बगड, रणजित पगारे, आर. पी. अहिरे, योगेश गोलेसर, किशोर वारे, विकी पिंगळे, रवींद्र आंधळे, सलीम पटेल, भास्कर कूवर, हेमंत मंडलिक, शेखर पाटील, किरण निकम, विश्वास लव्हारे, द्यानेश्र्वर गायकवाड, आर. डी. मोरे, नंदु अहिरे, डॉ. पणेर, साईनाथ ठाकरे, विलास शिंदे, मनोज रोटे, रविंद्र थेटे आदी उपस्थित होते.

या आहेत मागण्या

जुनी पेन्शन लागू करा, थकित महागाई भत्ता मंजूर करा, ७ वा वेतनाचा ३ रा थकीत हप्ता प्रदान करा, करोना संक्रमणाने मृत सेवकांच्या वारसांना सानुगृह अनुदान अदा करा, शेतकरी-कामगार-सेवक विरोधी कायदे रद्द करा, मयत सेवकांच्या वारसांना विना अट अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घ्या,

कंत्राटी धोरण रद्द करा, रिक्त पदे तत्काळ भरा, महागाई, बेरोजगारी नियंत्रणात आणा, बक्षी समिती खंड दोन प्रकाशीत करा, राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा, केंद्र प्रमाणे भत्ते लागू करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित आस्थापनेवर कायम करा,

आऊट सोर्सिग कंत्राटी धोरण रद्द करा, सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावा, सर्व किमान वेतन, मानधनवरील सेवकांचे प्रश्न मार्गी लावा, सर्व सेवकांचे वेतन वेळेत अदा करा, पंचायत समिती स्थरावरील कर्मचाऱ्यांचे वेतन तालुका उप कोषागारातून अदा करा, सर्व विभागातील सेवकांच्या पदोन्नत्या मार्गी लावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com