अचानक आशा सेविकांना स्वप्नातली पैठणी म्हणून 'भाऊबीज' मिळते तेव्हा...

अचानक आशा सेविकांना स्वप्नातली पैठणी म्हणून 'भाऊबीज' मिळते तेव्हा...

मोखाडा l Mokhada (वार्ताहर)

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था व जिजाऊ संघटना संस्थापक तथा अध्यक्ष निलेशजी भगवान सांबरे यांच्या माध्यमातून कोव्हिड-१९च्या काळात स्वःताच्या जीवाची व आपल्या परिवाराची काळजी न करता आपले कार्य उत्तमपणे बजावणाऱ्या आशासेविका, आरोग्य सेविका, परीचारीका यांच्या सोबत प्राथमिक आरोग्य केंद्र, मो-हांडा, खोडाळा, वाशाळा, असे या ठिकाणी कृतज्ञतेची भाऊबीज कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी आशा सेविका, आरोग्य सेविका, परीचारीका यांना निलेश सांबरेंच्या जिजाऊच्यावतीने भाऊबीज म्हणून पैठणी साडी भेट देण्यात आली. पालघर व ठाणे जिल्ह्यात साधारण ५ हजार साड्यांची भेट यावेळी देण्यात आली.

आजची भाऊबीज ही आशासेविका व परिचारिकांच्या आयुष्यातील सर्वांत आनंदमयी भाऊबीज आहे. आमच्या कार्याची दखल आजवर कोणीही घेतली नव्हती. परंतु माणसातील देव माणूस बंधुराया निलेशजी सांबरेंनी आमची दखल घेतली.

सतत चांगल्या कामाचे कौतुक करणारे निलेशजी सांबरेनी आमच्यासाठी भाऊबिजेची भेट पाठवली व आम्हा सर्व आशासेविकांना स्वःताच्या बहिणीची जागा दिली.

ही आमच्याकरीता लाख मोलाची गोष्ट आहे. संपूर्ण ठाणे-पालघर जिल्हा ज्यांनी सामाजिक कार्याने व्यापून टाकला आहे. अशा गोरगरीबांची तळमळ असणारा भाऊराया निलेश सांबरेंच्या रूपाने आम्हा आशा सेविकांना मिळाला हे आमचे सुदैव आहे. अशी भावना आशा सेविकांनी मनोगतामध्ये व्यक्त केली. त्यामुळे आम्ही त्यांचे खुप आभार मानतो असेही आशासेविका म्हणाल्या.

कार्यक्रमा प्रसंगी विक्रमगड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक रविंद्रजी खुताडे, डॉ.देवघरे, डॉ. गोखले, डॉ. महाजन, डॉ.शेख, अल्लाउद्दीन शेख, नितिन आहेर, प्रतिक पाघारे, नरेंद्र चौधरी व जिजाऊ संघटनेच्या शाखेंचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पालघर व ठाणे जिल्ह्यातील जनतेच्या हाताला काम, उत्तम गुणवत्तेचे शिक्षण व चांगल्या दर्जाच्या आरोग्याच्या सोयी मिळवून देणार आणि बेरोजगारी व स्थलांतर कायमचे दूर करणार.

निलेशजी सांबरे, संस्थापक जिजाऊ संस्था उपाध्यक्ष, जि. प. पालघर

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com