जिल्हा परिषद सेवक संघटना बदल्यांसाठी आक्रमक

जिल्हा परिषद सेवक संघटना बदल्यांसाठी आक्रमक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद (Zilla Parishad ) सेवकांच्या बदल्या( Transfers ) होणार की नाही ? याबाबत एकीकडे प्रश्न चिन्ह असताना दुसरीकडे मात्र,जिल्हा परिषद सेवकांच्या विविध संघटनानी बदल्यांसाठी आक्रमक झाल्या आहेत.

या संदर्भात जिल्हा परिषद कर्मचारी युनियन संघटनेने प्रशासनाला पत्र देत समतोल साधत बदल्यांची आग्रही मागणी केली.संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार हळदे, कार्याध्यक्ष रवींद्र थेटे, सचिव अनिल गिते यांच्या नेतृत्वखालील शिष्टमंडळाने उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेत, बदल्यांची मागणी केली.

सेवकांच्या बदल्या दोन वर्षापासून रखडलेल्या आहेत.परिणामी विनंती बदलीपात्र सेवकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. आदिवासी भागातील सुरगाणा, पेठ, कळवण, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, इगतपुरी, देवळा व बागलाण येथील सेवक आदिवासी क्षेत्रात तर मालेगाव, नांदगाव, सिन्नऱ व येवला येथील सेवक देखील कित्येक वर्षापासून कार्यरत असुन ते प्रशासकीय व विनंती बदली पात्र आहेत.या सेवकांच्या मुलांचे शिक्षण, कौटूंबिक अडचणी, वयोवृध्द आई -वडील या सर्वांचा विचार करता या सेवकांच्या यंदा बदल्या होणे अत्यंत आवश्यक आहे.

यंदाच्या बदली प्रक्रीयेत बदल्या होतील, अशी अपेक्षा होती. परंतू, सदर आदेशानुसार बदल्या न झाल्याने सेवकांत नाराजी असून, त्यांनी आपल्या तीव्र भावना संघटनेकडे व्यक्त केलेल्या आहेत. शासन परिपत्रकानुसार किमान लिपीक, लेखा व परिचर कर्मचा-यांच्या चालु वर्षी आपले स्तरावर प्रशासकीय समतोल साधुन बदल्या कराव्यात,अशी मागणी संघटनेने यावेळी केली. याप्रसंगी प्रशांत कवडे, श्रीरंग दिक्षीत, शितल शिंदे, शेखर फसाळे, दिनकर सांगळे, राजेश ठाकूर, कानिफ फडोळ, दिलीप टोपे, अर्चना गागुर्डे, विजया निकम, ज्ञानेश्वर गायकवाड, अनिल दराडे, प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com