जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा 'या' तारखेला

जिल्हा परिषद
जिल्हा परिषद

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहिर केले. जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२३-२४ वितरण कार्यक्रम दिनांक ९ सप्टेंबर रोजी रावसाहेब थोरात सभागृह गंगापुर रोड नाशिक येथे आयोजित केला आहे, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक नितीन बच्छाव यांनी दिली.

जिल्हयातील १५ तालुक्यातुन एकूण २८ प्राथमिक शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. तालुका बदलून गट शिक्षणाधिकारी यांना प्रस्ताव पडताळणी साठी देण्यात आले होते. गट शिक्षणाधिकारी, यांनी प्रस्तावांची पडताळणी प्रत्यक्ष शाळांना भेटी देऊन केली व विहित पडताळणी प्र पत्र गुणांकनासह पडताळणी अहवाल गोपनीय रित्या बंद लिफाप्यात जिल्हा कार्यालयास सादर केला होता. त्यानुसार जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक निवड समितीने गुणवत्तेच्या आधारावर प्रत्येक तालुक्यातून एका प्राथमिक शिक्षकाची निवड करुन १५ गुणवंत शिक्षकांची यादी.

विभागीय आयुक्तांकडे मान्यतेस्तव सादर केली होता त्यास त्यांनी मान्यता दिली.निवड झालेल्या सर्व गुणवंत शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिनंदन केले आहे.

हे आहेत गुणवंत शिक्षक :

बागलाण : प्रमिला भावराव पगार, प्राथमिक शिक्षिका, भिलदर, ता.बागलाण

चांदवड : वैशाली विलास जाधव, प्राथमिक शिक्षिका, एकरुखे, ता.चांदवड

देवळा : अर्चना दादाजी आहेर, प्राथमिक शिक्षिका, पिंपळेश्वर (वा), ता. देवळा

दिंडोरी : नौशाद अब्बास मुसलमान, प्राथमिक शिक्षक, परमोरी, ता.दिंडोरी

कळवण : चित्रा धर्मा देवरे, प्राथमिक शिक्षिका, अभोणा मुली, ता. कळवण

इगतपुरी : अनिल सारंगधर शिरसाठ, प्राथमिक शिक्षक, , जामुंडे, ता.इगतपुरी

मालेगाव : प्रतिभा सुनील अहिरे, प्राथमिक शिक्षका, वजीरखेडे, ता. मालेगाव

निफाड : देवेंद्र वसंतराव वाघ, प्राथमिक शिक्षक, देवीचा माथा, ता.निफाड

नाशिक : उत्तम भिकन पवार, प्राथमिक शिक्षक, हनुमान वाडी, ता.नाशिक

नांदगाव : राजकुमार माणिकराव बोरसे, मुख्याध्यापक, साकोरा, ता.नांदगाव

पेठ : रवींद्र सुभाष खंबाईत, पदवीधर प्राथ. शिक्षक, मोहपाडा ता.पेठ

सिन्नर : संतोष बाळासाहेब झावरे, आशापुरी(घोटेवाडी) ता.सिन्नर

सुरगाणा : परशराम पंडीत पाडवी, प्राथमिक शिक्षक, शिंदे (दि) ता.सुरगाणा

येवला : बालाजी बिभीषण नाईकवाडी, प्राथमिक शिक्षक, पांडववाडी, ता. येवला

त्र्यंबकेश्वर : अर्चना ज्ञानदेव गाडगे, प्राथमिक शिक्षिका, , हेदुलीपाडा ता. त्र्यंबकेश्वर

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com