जिल्हा परीषद सदस्या सारीका निकम व प्रकाश निकम यांचा सत्कार

जिल्हा परीषद सदस्या सारीका निकम व प्रकाश निकम यांचा सत्कार

मोखाडा | Mokhada माधुरी आहेर

जिल्हा परीषदेच्या (Zilla Parishad) पोटनिवडणूकीत (By-election) पोशेरा गटातून भरघोस मते मिळवत निवडून आलेल्या सारीका निकम (Sarika Nikam) व जिल्हा परीषद सदस्य (Zilla Parishad Member) प्रकाश निकम (Prakash Nikam) यांचा

शिक्षक सेनेच्या (Shikshak Dena) पदाधिकारी राजेंद्र जाधव, भाऊ नावळे, चंद्रकांत नांदे, विलास डामसे, नितिन आहेर, रियाज शेख यांनी दि 8 आक्टोंबर वार शुक्रवार रोजी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार केला व अभिनंदन केले.

दोन ते तीन वेळा सभापती राहीलेल्या सारीका निकम यांनी त्यांच्या सभापती पदाच्या कार्यकाळात लोकोपयोगी कामे केल्यामुळेच त्यांना जनता-जनार्दनाने पसंती देत विजयी केले असल्याचे मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केले.

यावेळी शिक्षक सेनेच्या पदाधिका-यांनी शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी निकम दांम्पत्याकडे केली.,तेव्हा योग्य ते संपूर्ण सहकार्य मिळेल व शिक्षकांचे प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन प्रकाश निकम व सारीका निकम यांनी दिले.

Related Stories

No stories found.