'या' तारखेपासून जिल्हा परिषद कर्मचारी बेमुदत संपावर

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन
'या' तारखेपासून जिल्हा परिषद कर्मचारी बेमुदत संपावर

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या शिक्षक, कर्मचाऱ्यांना नविन पेन्शन योजना ही फायदेशीर नसल्याने सर्वाना जुनीच पेन्शन (Pension) लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परीषद (Zilla Parishad) कर्मचारी महासंघातर्फे दि. १४ मार्च  बेमुदत राज्यव्यापी संप (Statewide strike) करण्यात येणार आहे.

जिल्हा परीषद कर्मचारी महासंघ नाशिक यांच्यावतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, उप जिल्हाधिकारी (प्रशासन) भिमराज दराडे (Bhimraj Darade) यांच्यामार्फेत मुख्यमंत्री (Chief Minister) यांना बेमुदत संपाविषयी कळविले आहे. अशी माहिती राज्य महासंघाचे उपाध्यक्ष  कैलास वाघचौरे, जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, सरचिटणीस महेंद्र पवार, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, राज्य पदाधिकारी मधुकर आढाव यांनी दिली.

निवेदनात म्हटले आहे की, सर्वाना जुनी पेन्शन लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे, सर्व विभागातील रिक्त पदे अग्रक्रमाने भरणे, आदि प्रश्न शासन  स्थरावर दीर्घकाळ प्रलंबीत असल्याने याबाबत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परीषद कर्मचारी महासंघ व इतर घटक संघटना मार्फत संप, मोर्चे, धरणे, निदर्शने  आणि चर्चा व्दारे प्रलंबीत मागण्यांबाबत सातत्याने  प्रयत्न झाले.

परंतु शासनाने आजपर्यंत वाटाण्याच्या अक्षताच लावल्याने राज्यातील सर्वदुर कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर, कंत्राटी कर्मचारी कमालीचे संतप्त झाल्याने राज्यातील १७ लाख राज्य सरकारी, जिल्हा परीषद - निमसरकारी, शिक्षक कर्मचारी तसेच ५ लाख महानगर पालीका, नगरपालिका, नगर परीषद, नगर पंचायत व कंत्राटी कर्मचारी हे कृती समितीच्या माध्यमातुन दि. १४ मार्च पासून बेमुदत राज्यव्यापी संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. असे निवेदनात दिले आहे.

यावेळी विक्रम पिंगळे, सचिन विंचुरकर, संजय पगार,प्रमोद निरगुडे, पांडुरंग वाजे, सुनीता पिंगळे, चारुशीला भोसले, लीना थोरमिसे, मनीषा जगताप, पांडुरंग वाजे आदी पदाधिकारी उपस्थित  होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com