जि.प.संघटनांची निदर्शने
नाशिक

जि.प.संघटनांची निदर्शने

शासनाच्या धोरणांचा निषेध

Vijay Gite

Vijay Gite

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्र राज्य,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ नाशिकच्यावतीने दुपारी भोजनाच्या सुट्टीत शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच संघटनेच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सुरज मांढरे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ नाशिकच्य वतीने सेवक विरोधी धोरण मागे घ्यावे, जुनी पेन्शन योजना लागु करणे, स्वामी नाथन आयोगाच्या शिफारसी लागू करणे, लॉकडाऊन काळात कर्मचारी यांना संपूर्ण वेतन देणे,

खाजगी कंत्राटी करण बंद करुन कंत्राटी व मानधनावरील कर्मचारी यांना सेवेत कायम करणे, विविध विभागातील रिक्त पदे तात्काळ भरणे, कोविड 19 योध्यांना सुरक्षिततेसाठी पुरेसे वैयक्तिक सुरक्षा उपकरण व इतर सुरक्षितता साधणे पुरविणे त्यांना विमा मुदतवाढ देणे,महागाई भत्ता गोठविण्याचे धोरण रद्द करुन जुलै 2019 पासून फरकासह महागाई भत्ता लागू करणे,

सातव्या वेतन आयोगाचा दुसरा टप्पा 1 वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय त्वरीत रद्‌द करणे यासह विविध मागण्यांसाठी सदरचे आंदोलन करण्यात आले.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शासनाने आऊटसोर्सिग मार्फत भरती करण्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या राज्यातील 3 हजार सेवकांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सप्टेंबरपर्यत सदरच्या सेवकांना तात्पुरती मुदतवाढ दिली आहे.

मात्र, कंत्राटदारामार्फत भरती न करता सध्या कार्यरत असलेल्या सेवकांना सेवेत कायम करण्यासाठी संघटनेच्यावतीने पाठपुरावा सुरु असल्याचे माहिती महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर यांनी दिली.

यावेळी महासंघाचे अध्यक्ष अरुण आहेर, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील, सरचिटणीस महेंद्र पवार, विभागीय उपाध्यक्ष कैलास वाघचौरे, उपाध्यक्ष, सचिन विंचुरकर, रविंद्र आंधळे, रणजीत पगारे,शोभा खैरनार, राज्य शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंबादास वाजे, शिक्षक समितीचे काळू बोरसे, जिल्हा परिषद परिचर संघटनेचे जिल्हाध्यक्ष, विलास शिंदे, उदय लोखंडे,मंगला भवर, प्रमोद निरगुडे, नितीन मालुसरे , मंगेश केदारे, विक्रम पिंगळे, यासिन सैय्यद, राजेश मोरे, विशाल हांडोरे, किशोर वारे आदी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com