जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अतिदुर्गम भागात केली पाहणी

जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अतिदुर्गम भागात केली पाहणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला बालकल्याण) दीपक चाटे (Deputy CEO Deepak Chate) यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत (Child Development Services Scheme) उमराळे व पेठ तालुक्यातील (Umrale and Peth) अतिदुर्गम भागातील मांगोणे, कोपुर्ली अंगणवाडी केंद्राला भेट देत पाहणी केली.

या भेटीत ६ महिने ते ३ वर्षे आणि ३ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या पोषण आहाराची (Nutritional diet) तपासणी करण्यात आली. तसेच अंगणवाडी सोबतच कोपुर्ली व मांगोणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन ४ वर्षे ६ महिने ते ६ वर्षांची बालके शाळेत बसत असल्याची खात्री करण्यात आली. त्याचबरोबर अंगणवाडीतील (Anganwadi) मुलांची उपस्थिती वाढविण्याच्या सक्तसूचनाही देण्यात आल्या.

तसेच जोगमोडी व आंबे याठिकाणच्या अंगणवाडी सेविकांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. यात मुलांची उपस्थित वाढवणे, बालविवाह, कुपोषण, बाल व माता मृत्यू दर कमी करणे, अंगणवाडीत लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात घेण्यात यावा, पोषण आहारामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यक्रम व गृहभेटी करून सर्वांनी डॅशबोर्डवर नोंदी कराव्या अशा सूचना देण्यात आल्या.

लंम्पी आजाराबाबत (Lumpy disease) आंबे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट दिली.पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून लंम्पी आजार नसल्याचे निदर्शनास आले. केंद्र शासनाने सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण घोषित केला असल्याने जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांनी लोकसहभाग घेऊन साजरा करावा अशा सूचनाही चाटे यांनी अंगणवाडी सेविकांना दिल्या.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com