विकास आराखड्यासाठी जिल्हा परिषदेची समिती

विकास आराखड्यासाठी जिल्हा परिषदेची समिती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आमचं गाव, आमचा विकास उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीच्या नियोजनासाठी 2022-23 वर्षाचा वार्षिक ग्रामपंचायत Grampanchayat , पंचायत समिती panchayat Samities, जिल्हा परिषद विकास आराखडा Committee for Development Planतयार करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीत पदाधिकार्‍यांसह 20 अधिकार्‍यांचा सहभाग आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी वितरीत केला जात असतो. त्यातील 80 टक्के रक्कम थेट ग्रामपंचायतींना व प्रत्येकी 10 टक्के रक्कम जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना दिली जाते. ग्रामपंचायतींनी या निधीचा विनियोग करण्यासाठी ग्रामसभेत विकास आराखडा तयार करून तो मंजूर करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे पंचायत समितीस्तरावर व जिल्हा परिषदस्तरावरही निधीच्या नियोजनासाठी वार्षिक व पंचवार्षिक विकास आराखडे तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

या विकास आराखड्यांमध्ये कोणत्या कामांचा समावेश करावा याबाबत स्पष्ट सूचना जून 2021 च्या शासन निर्णयात दिल्या आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून नोव्हेंबर 2021 मध्ये 2022-23 या आर्थिक वर्षातील विकास आराखडा तयार करून त्यावर सनियंत्रणासाठी जिल्हा परिषदेने समिती स्थापन केली आहे.

समिती नोव्हेंबरमध्ये, पत्र जानेवारीत

जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीच्या नियोजनासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यांवर सनियंत्रणासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही समिती 15 नोव्हेंबरला स्थापन केली असून त्याबाबतचे नियुक्तीपत्र सदस्यांना जानेवारीमध्ये देण्यात येत आहेत.

केंद्र सरकारकडून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदा असा विभागून दिला जात आहे. या निधीतील 80 टक्के रक्कम ग्रामपंचायतींना व प्रत्येकी दहा टक्के रक्कम जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना दिली जात आहे. ग्रामपंचायतींनी या निधीचा विनियोग करण्यासाठी ग्रामसभेत विकास आराखडा तयार करून तो मंजूर करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे पंचायत समिती स्तरावर व जिल्हा परिषद स्तरावरही निधीच्या नियोजनासाठी वार्षिक व पंचवार्षिक विकास आराखडे तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.