जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा होणार सन्मान

जिल्हा परिषद
जिल्हा परिषद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषद सदस्य (Zilla Parishad Member) आणि पंचायत समिती सदस्यांच्या (Panchayat Samiti Member) विशेष कामगिरीची व योगदानाची नोंद घेऊन सदस्यांना सन्मानित केले जाणार आहे… यासाठी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी पुरस्कारासाठी (Award) नामांकन पाठविण्याचे आवाहन जि. प. व पं. स. असोशिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. आत्माराम कुंभार्डे (Dr. Aatmaram Kumbharde) यांनी केले आहे...

राज्यात प्रथमच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या असोशिएशनची स्थापना झालेली आहे. ग्रामपंचायतीबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा ग्रामीण भागाला विकासाच्या प्रक्रियेत पुढे नेण्यात अतिशय महत्वाचा वाटा आहे.

मात्र, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांच्या विशेष कामगिरीची व योगदानाची नोंद घेण्याची कोणतीही व्यवस्था नाही, अशातच दरवेळी बदलणारे गट व गण आणि आरक्षण यामुळे निवडणुकीपासूनही हे सदस्य वंचित राहतात.

या सर्व बाबींचा विचार करुन राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीवर असणाऱ्या सदस्यांचे मनोबल व कार्याचा गुणगौरव व्हावा, या दृष्टीकोनातून या संघटनेने दरवर्षी 'कार्यक्षम पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य पुरस्कार' उपक्रम राबविला जाणार आहे. या पुरस्कार योजनेचे हे पहिलेच वर्ष असल्याने गेल्या साडेचार वर्षातील सदस्यांच्या कामगिरीचा विचार केला जाणार आहे.

असे आहे पुरस्काराचे स्वरूप

या पुरस्काराअंतर्गत राज्यस्तरीय ५ विशेष कामगिरी पुरस्कार, १० कार्यक्षम जि.प.सदस्य, १० कार्यक्षम पं.स.सदस्य, ३ कार्यक्षम जि.प.अध्यक्ष, ३ जि.प.उपाध्यक्ष, ३ विषय समिती सभापती, ३ पं.स.सभापती, ३ पं. स. उपसभापती व प्रत्येक विभागातून ५ कार्यक्षम जि. प. सदस्य, ५ कार्यक्षम पं. स. सदस्य पुरस्कार देण्यात येणार आहेत.

त्यानुसार असोशिएशनकडे प्राप्त प्रस्तावांनुसार गुणांच्या आधारे हे पुरस्कार जाहीर होतील. नामांकन पाठविण्याची मुदत दि. ३० सप्टेंबर २०२१ असून अधिक माहितीसाठी जि. प. व पं. स. असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com