जिल्हा परिषदेच्या 'सुपर 50' उपक्रमाचे पालकमात्र्यांच्या हस्ते शुभारंभ

जिल्हा परिषदेच्या 'सुपर 50' उपक्रमाचे पालकमात्र्यांच्या हस्ते शुभारंभ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक जिल्हा परिषदेतर्फे (Nashik Zilha Parishad) ग्रामीण भागातील (rural area) अनुसूचित जाती जमाती (Scheduled Caste Tribes) प्रवर्गातील इयत्ता 11 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी (students) ’सुपर 50’ उपक्रम ('Super 50' initiative) हाती घेण्यात आला आहे. त्याचा शुभारंभ आज पालकमंत्री दादा भुसे (Guardian Minister Dada Bhuse) यांच्या हस्ते झाला.

या उपक्रमामध्ये अनुसूचित जाती, जमाती या प्रवर्गातील सन 2022-23 मध्ये इयत्ता 11 वी विज्ञान शाखेतील अनुदानित, अंशतः अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालये, आश्रमशाळेतील प्रवेशीत विद्यार्थ्यांकरीता (students) निवासी स्वरुपात नियमित अभ्यासक्रमाबरोबर सीईटी (CET), जेईई (JEE) या पात्रता परीक्षेकरीता 50 विद्यार्थ्यांची परीक्षेद्वारे निवड करण्यात येऊन या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन (Training and guidance) करण्यात येणार आहे.

परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून (Department of Secondary Education) संपूर्ण जिल्ह्यातुन यासाठी एक पात्रता परीक्षा घेण्यात येणार असून यामधील 50 विद्यार्थ्यांची निवड ही ’सुपर 50’ उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहे. त्यासाठी 3600 विद्यार्थ्यांची नाेंंदनी झाली आहे. त्यातुन सुपर 50 विद्यार्थी निवडले जाणार आहेत. सदर योजनेचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यास दोन वर्षासाठी प्रशिक्षण व सर्व खर्च या निधीतुन होणार आहे.

या उपक्रमची माहीती जिल्हा प्ररीषदेच्या मुख्य कार्यकारी अधीकारी असीमा मित्तल (Asima Mittal, Chief Executive Officer, District Council) यांंनी यावेळी दिली. जिल्हाधीकारी गंगाथरण डी. (Collector Gangatharan D.), अतीररीक्त मुख्य कार्यकारी अधीकारी अर्जुन गुंंडे आदींसह अधीकारी उपस्थीत होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com