वन्यजीव सप्ताह निमित्ताने 'शुन्यसर्पदंश अभियान'

वन्यजीव सप्ताह निमित्ताने 'शुन्यसर्पदंश अभियान'

ओझर | प्रतिनिधी Ozar

म.वि.प्र. (MVP) समाजाचे जनता विद्यालय (janta vidyalaya), कारसुळ येथे १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणाऱ्या वन्यजीव सप्ताहाचे (wildlife week) निमित्ताने शुन्यसर्पदंश अभियान (Zero Snake bite Campaign) व वन्यजीव - मानव सहजीवन (wildlife-human symbiosis) यावर आधारित व्याख्यानाचे आयोजन (Organizing lectures) करण्यात आले.

वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था नाशिक (Wildlife Conservation Multipurpose Organization Nashik) व म.वि.प्र.समाजाचे (maratha vidya prasarak samaj) जनता विद्यालय, कारसुळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात होणारे सर्पदंश (snake bite) कशा प्रकारे टाळता येतील तसेच सर्पदंश झाल्यास काय प्रथमोपचार करावा याच बरोबर मानव व वन्यजीव यांचे सहजीवन याबद्दल ची विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शास्त्रीय माहिती मिळावी यासाठी कोरोनाचे (corona) नियम पाळून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य सुशांत रणशूर यांनी विद्यार्थ्यांना (students) व शिक्षकांना (teachers) पॉवर पॉईंट प्रेसेंटशन (Power point presentation) द्वारे शास्त्रीय माहिती दिली .विद्यार्थी व शिक्षकांनी यावर आधारीत प्रश्नांची उत्तरे जाणून घेत कार्यक्रमात सहभागी होत चांगली माहिती जाणून घेतली तसेच विद्यार्थ्यांनी ऐकलेली माहिती स्वतः पूर्ती मर्यादित न ठेवता ते आपल्या घरातील सदस्य ,नातेवाईक व मित्र मंडळींना देखील सांगणार असल्याचे आश्वासन दिले.

विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कांचनमाला हुजरे यांनी सुशांत रणशूर ,विकास शिंगाडे यांचा सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच विद्यालयाचे शिक्षक सागर जाधव,अर्चना जाधव ,भारती कुंदे ,यशश्री घोरपडे ,राकेश पिंपळे तसेच जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक तळेले,कदम,धोंडगे तसेच वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जयेश पाटील उपाध्यक्ष दीपक महाजन,सचिव धीरज शेकोकारे ,प्रमोद महानुभाव,अमोल सोनवणे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.