खर्च चार लाख, इन्कम झिरो; शेतकऱ्याने पेरूच्या बागेवर चालवली कुऱ्हाड

खर्च चार लाख, इन्कम झिरो; शेतकऱ्याने पेरूच्या बागेवर चालवली कुऱ्हाड

येवला | प्रतिनिधी Yeola

कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांमुळे तीन वर्षात चार लाख रुपये खर्च करून शून्य उत्पन्न हाती आल्यामुळे येवला (Yeola) तालुक्यातील चिचोंडी (Chichondi) येथील मच्छीन्द्र मढवई (Machindra Madhvai) या शेतकऱ्याने पेरूच्या बागेवर कुऱ्हाड चालवत संपूर्ण पेरूची बाग नष्ट केली आहे....

येवला तालुक्यातील चिचोंडी बुद्रुक या गावातील शेतकरी मच्छिंद्र मढवई यांनी पारंपारिक धान्य, कडधान्याच्या शेतीला फाटा देत पेरूची बाग फुलवली होती. मात्र हा वेगळा प्रयोग मच्छिंद्र मढवई या शेतकऱ्याच्या अंगलट आला आहे.

सन २०१८ मध्ये ४९ विविध जातीचे पेरूचे अकराशे झाडांची लागवड केली होती. अपेक्षेप्रमाणे गेल्यावर्षी पेरूच्या झाडाला फळधारणाही सुरू झाली. उत्पादन चांगले आले. पण करोनाचा प्रादुर्भाव असल्याने पेरूला ग्राहकच मिळेना.

त्यामुळे उत्पादन चांगले येऊनही उत्पन्न शून्य (Income Zero) झाले. या चांगल्या उत्पादनाला उठाव नव्हता. व्यापारी आले नाही, त्यामुळे बाजार भाव मातीमोल राहिले.

तर यंदा फुलकळी चांगली आली, काही झाडांना फळेही चांगली आली, पण गेल्या आठवड्यात गुलाब चक्रीवादळाच्या (Gulab Cyclone) प्रभावामुळे येवला तालुक्‍यात अतिवृष्टी (heavy rain in Yeola) मुळे पेरुच्या बागेला आलेल्या कळ्या आणि फळे जमीनदोस्त झाल्यामुळे तीन वर्षात केलेले चार लाख रुपये खर्च पूर्णपणे वाया गेले.

दरवर्षी नुकसान तरी सोसावी किती? बँकेचे, सोसायटीचे कर्ज फेडावे तरी कसे? यामुळे पेरूच्या बागेवर कुऱ्हाड चालवण्याचा दुर्दैवी निर्णय घेतल्याचे शेतकरी मच्छिंद्र मढवई यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.