इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नाशकात युवासेनेची सायकल रॅली

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नाशकात युवासेनेची सायकल रॅली

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

इंधन दरवाढीविरोधात (Fuel Price Hike) केंद्र सरकारचा (Central Government) निषेध करण्यासाठी राज्याचे पर्यटनमंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ३१ ऑक्टोबर रोजी युवा सेनेच्या (Yuvasena) वतीने राज्यभर 'सायकल रॅली'च्या (Cycle Rally) आयोजनाचे आवाहन करण्यात आले होते. यानुसार आज नाशिकमध्ये युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सायकल रॅली काढण्यात आली...

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोजच वाढ होत आहे. पेट्रोल डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. याशिवाय घरगुती सिलिंडरच्या किमतीतदेखील सातत्याने वाढ होत आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडराच्या वाढीमुळे सामान्यांचे हाल होत आहेत. गॅसदरवाढीमुळे गृहिणींनाही आर्थिक संकटाला (financial crisis) सामोरे जावे लागत आहे. यामुळे केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी युवसेनेच्या वतीने आज सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी युवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com