Nashik : युवकाची हातोडीने वार करुन हत्या

Nashik : युवकाची हातोडीने वार करुन हत्या

नांदगाव । प्रतिनिधी |Nandgaon

येथील आनंद नगरमध्ये (Anand Nagar) एका युवकाची (youth) हातोडीने वार करत हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे...

Nashik : युवकाची हातोडीने वार करुन हत्या
सकल हिंदू समाजाकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात शुद्धीकरण

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मीक साहेबराव ठाकूर (पवार) (३५) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून मंगळवार (दि. १६) रोजी रात्री राहत्या घरी त्याच्या पायांवर आणि डोक्यात हातोडीने वार करून गंभीर जखमी करत ठार (killed) मारले.

Nashik : युवकाची हातोडीने वार करुन हत्या
नाशिकमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा राडा; पत्रकारांना मारहाण

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करत एका संशयित आरोपींला अटक (Arrested) केली असून संशयित आरोपीच्या सासू-सासऱ्यांना म्हणजेच मृत वाल्मीकच्या आई-वडीलांना वाल्मीक नेहमीच दारु पिऊन मारहाण (Beating) करत असल्याने ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे करत आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com