जानोरीत भाडेकरूची आत्महत्या

जानोरीत भाडेकरूची आत्महत्या

जानोरी |वार्ताहर Janori

जानोरी शिवारातील जानोरी-विमानतळरोडवरील एका घरात युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

जनार्दन शंकर जामकर (वय-३५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सविस्तर वृत्त असे की,विजय पांडुरंग अपसुंदे हे सकाळी ७ वाजेचे सुमारास नेहमीप्रमाणे मळ्यात गायीचे दुध काढण्यासाठी आले होते.

याच वेळी त्यांच्या खोलीत राहत असलेला भाडेकरु जनार्दन जामकर याचे खोलीत टी.व्ही. चालु असल्याचा आवाज आला.

म्हणुन त्यास आवाज दिला व दरवाजा वाजवून बघितला. परंतु, आतुन प्रतिसाद दिला नाही. म्हणुन दरवाजा जवळील खिडकितुन आत डोकावून पाहिले असता लोखंडी पाईपाला साडीने बांधुन गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले.

जनार्दन जामकर याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर घटना दिंडोरी पोलीस स्टेशनला कळवली.

खबर मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड, एस.के‌.जाधव घटनास्थळी दाखल झाले दरवाजा तोडून आत प्रवेश करत गळफास घेतलेल्या जनार्दन जामकर यांचा मृतदेह खाली उतरविला.

त्यानंतर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात सदर मृतदेहाचे केल्यानंतर शोकाकुल वातावरणात जऊळके-दिंडोरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.उप निरी.अरुण आव्हाड, पोहवा.एस.के.जाधव हे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com